मराठा आरक्षण प्रश्‍न: गोदावरीत जलसमाधीसाठी गेलेला आंदोलक ताब्यात | पुढारी

मराठा आरक्षण प्रश्‍न: गोदावरीत जलसमाधीसाठी गेलेला आंदोलक ताब्यात

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण: प्रश्‍न तात्‍काळ साेडविण्‍यात यावा, या मागणीसाठी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलेला आंदोलक मनोज जरांगे-पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मराठा आरक्षण: प्रश्‍नी बलिदान देणार्‍या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदाेलन करण्‍यात येणार हाेते. शहागड येथील उड्डाणपूलारून उडी मारुन जलसमाधी घेईन., असा इशारा मनोज जरांगे-पाटील याने दिले हाेते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ४५ मराठा बांधवांनी आपले बलिदान दिले होते. याला तीन चार वर्षे उलटून गेली आहेत. तरीही सरकार मराठा समाजाच्‍या मागणीकडे  दुर्लक्ष करत आहे. सरकारनेच बलिदान देणार्‍या कुटुंबीयांना आश्वासन दिले होते.

प्रत्येक कुटुंबाला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी मिळेल. त्यांनी १० लाख रुपये देण्याचे कबुल केले होते. यामुळे सरकारने २८ सप्टेंबरपर्यंत मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत. तर २९ सप्टेंबर रोजी, शहागड येथील उड्डाणपूलारून उडी मारुन जलसमाधी घेईन, असा इशारा मनोज जरांगे-पाटील याने दिला हाेता.

माझ्‍या जलसमाधीनंतर राज्यात सकल मराठा समाजाकडून जी काही असंतोषाची लाट उसळेल. त्या उद्रेकास सर्वस्वी जबाबदार हे सरकारचं असेल, असा इशाराही त्‍याने सरकारला दिला हाेता. याची प्रशासनाने दखल घेतली.

गोंदी पोलिसांनी वेळीच मनोज जरांगे यांना सकाळी ६ वाजता ताब्यात घेतले. यावेळी गोंदी पोलिसांनी शहागड गोदावरी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी गोंदी ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे व पोलिस कर्मचारी होते.

हेही वाचलं का ? 

Back to top button