मिताली राजने गमावले वन-डे क्रमवारीतील अव्वल स्थान

मिताली राजने गमावले वन-डे क्रमवारीतील अव्वल स्थान
Published on
Updated on

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आयसीसीने जारी केलेल्या वन-डे क्रमवारीतील आपले पहिले स्थान गमावले. मिताली आता तिसर्‍या स्थानावर घसरली आहे. मात्र, भारताची प्रमुख वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने गोलंदाजी क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या वन-डे मालिकेतील खराब कामगिरीमुळे मितालीने क्रमवारीतील अव्वल स्थान गमावले. तिने या मालिकेत 29 च्या सरासरीने केवळ 87 धावा काढल्या असून, तिचे 738 इतके रेटिंग गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेची लिजेल ली ही 761 गुणांसह दुसर्‍या स्थानावरून पहिल्या स्थानावर पोहोचली.

तर, भारताविरुद्धच्या तीन सामन्यांत 112 धावा काढणारी ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली 750 गुणांसह दुसर्‍या स्थानावर पोहोचली. तर, भारतीय फलंदाज स्मृती मानधनाने सातव्या स्थानावरूप सहाव्या स्थानी पोहोचली आहे. तिचे 710 गुण आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news