मालेगाव : पोलिस उपमहानिरीक्षक अन् मालेगाव महसूलची कारवाई, नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात | पुढारी

मालेगाव : पोलिस उपमहानिरीक्षक अन् मालेगाव महसूलची कारवाई, नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : एका विरोधी नगरसेवकाशी निगडित व्यक्तीचा बायोडिझेल सदृश्य बेकायदेशीर इंधन साठा शहरात मिळून आला आहे. पोलिस उपमहानिरीक्षक यांचे विशेष पथक, महसूल विभागाने मंगळवारी ही कारवाई केली. त्यात बायोडिझेल सदृश्य  २३,२०० लिटर विस्फोटक द्रव्यासह ४३ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. दोघे सूत्रधार फरार झालेत. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

kanhaiya kumar : कन्हैया कुमार यांचा AC कांड

jayakwadi dam : जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जाधव यांच्या पथकाने तहसीलदार सी आर राजपूत यांना इंधन काळाबाजार संदर्भात माहिती दिली. त्यानंतर महसूलचे अधिकारी आणि विशेष पथकाने मुंबई आग्रा महामार्गालगतच्या स्टार हॉटेल शेजारील भावना रोड लाईन्स नावाच्या निळ्या पत्राच्या गाळ्यामध्ये छापा टाकला.

marathwada rain : सोलापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद

मिताली राजने गमावले वन-डे क्रमवारीतील अव्वल स्थान

शेख अनिस शेख रशीद (वय ३६, रा. गुलशेर नगर गल्ली.नं. ११ घर.नं. १५४५ मालेगाव) हा पकडला गेला. तो लहान टँकरमधून बायोडिझेल सदृश्य इंधन पंपाच्या साहाय्याने काढताना मिळून आला.

RCB vs RR : रॉयल भिडणार रॉयल्सविरुद्ध

पुण्यातील प्रेमीयुगुलाची लांबोटीत लॉजवर आत्महत्या

चौकशीत त्याने मालवाहू वाहनांमध्ये इंधन म्हणून भरण्यासाठी हे द्रव्य ड्रममध्ये साठवत असल्याचे सांगितले. तसेच मूळ मालक एजाज बेग अजीज बेग ( फरार) असल्याचे सांगितले. याप्रकरणी नायब तहसीलदार डी बी वाणी यांनी फिर्याद दिली.

गोडावून सील

पोलिसांनी जवळचं जे. के. मोटार्सच्या पाठीमागील बाजूस एका पत्राच्या गोडावूनमध्येही पाहणी केली. जावीद खान अहमद खान (३९, रा. चमन नगर गल्ली. नं. ५ आझादनगर) आणि शहजाद खान सलीम खान (२४, रा. राजा नगर गुरुवार्ड मालेगाव) हे दोघे ड्रममध्ये इंधन भरताना सापडले. त्यांनी माल जुबेर खान नासीर खान (फरार) याचा असल्याचे सांगितले.

गोडावून सील करण्यात आले. त्यातील ड्रम, टॅंकरमध्ये २३ हजार २०० लिटर बायोडीजेल सदृश्य विस्फोटक द्रव्य सापडले. अप्रमाणित मशीन असा ४३ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पवारवाडी पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध भारतीय दंड सहिता कलम २८५, १८८, ३४ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ सह स्फोटक अधिनियम (द्रव्य) अधिनियम १८८४ चे कलम ९ ब (१)(ब) प्रमाणे सह कलम मुंबई वजन व मापे (अंमलबजावणी) अधिनियम १९९८ चे कलम २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरच्या इंधनाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी याप्रमाणे महामार्गालगत बेकायदेशीर पेट्रोल पंप मिळून आला होता. त्याप्रकरणी माजी आमदार बंधुविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक बदली प्रकरण घडल्याची चर्चा झाली. आता माजी आमदार विरोधी गटाशी निगडित बायोडिझेल विक्रीत संशयित निघाल्याने उलटसुलट चर्चा होत आहे.

पूर्ण जैविक देश : श्रीलंकेचा धडा

नक्षलवाद्यासंबंधी हिंसाचारात ७० टक्के घट

कन्हैया कुमार, जिग्नेश काँग्रेसमध्ये

Back to top button