अहंकार वाढल्यास सर्वनाश निश्चित ! इंदुरीकर महाराज | पुढारी

अहंकार वाढल्यास सर्वनाश निश्चित ! इंदुरीकर महाराज

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : ज्याच्याकडे संपत्ती आहे, त्याचकडे प्रेम आणि आपुलकी व दया कमी होते आणि त्यातून अहंकार वाढतो. अहंकार वाढला की त्याचा सर्वनाश झाल्या शिवाय राहत नसल्याचे परखड मत महाराष्ट्रातील थोर समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशुमुख इंदुरीकर यांनी व्यक्त केले. संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे सुरू असणार्‍या गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

यावेळी आयोजित किर्तनात ते बोलत होते. यावेळी ठाणापती विष्णुपरी महाराज, शंकरानंदगिरी महाराज, सरदार संजय पाटणकर, शिवजीराव पाटणकर, चंद्र कांत पाटणकर ,रोहित पाटणकर, शनी देव महाराज, खा. डॉ. सुजय विखे आ. सत्यजित तांबे, माजी. खा. भाऊसाहेब वाकचौरे, रणजित देशमुख, जालिंदर वाकचौरे, डॉ. जयश्री थोरात, आबासाहेब थोरात, अजय फटांगरे, प्रवेक्षधिन पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने, कपिल पवार अशोक कानवडे, नानासाहेब दिघे, रामहारी कातोरे, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, उपाध्यक्ष संजयगिरी महाराज देशमुख, सागर वाकळे, प्रमोद देशमुख बाळासाहेब पानसरे, किसन पानसरे, नितीन पानसरे, राजेंद्र देशमुख आदि उपस्थित होते.

इंदुरीकर महाराज म्हणाले की, वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर, कळस संत तुकाराम महाराज, इमारत संत नामदेव तर भिंत एकनाथ महाराज आहे. एवढे महत्त्व वारकरी संप्रदायात संतांना आहे. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सप्ताह हा देवाची विभूती आहे. त्यामुळे या सप्ताहात तुम्ही जेवढे पुण्य कराल, तेवढे पुण्य इतर कुठे मिळणार नाही. पुस्तकी ज्ञानाचा उपयोग फक्त संसरासाठी होतो.तुम्ही कितीही शिका, तुम्ही अज्ञानी असेल, तर तुम्ही कुणाचेही गुलामच व्हाल, असे त्यांनी सांगितले.

आपल्याला कुठलेच ज्ञान नाही. आपण स्वतःला ज्ञानी समजतो, अक्कल शिकवते, मंदिरावर कळस चढाला की मंदिर पूर्ण होते.
अठरा अध्याय ज्ञानेशवरीचा कळस आहे. आठरावा अध्याय वाचला की ज्ञानेश्वरी वाचली असे होते. अष्टांग योग शिकले तरी देव भेटणार नाही. मात्र सर्व समस्यांचे मूळ आणि तुमचे कोणतेही प्रश्न असो त्या सर्वांचे उत्तर हरिपाठामध्ये आहे. हरिपाठ केला तर त्यातून तुम्हाला देव भेटेल. गगनगिरी महाराजांचा सप्ताहाचा काला संपल्यानंतर पाऊस आल्याशिवाय राहणार नाही. संसार नावाचे झाड वांझ आहे.

त्याला अज्ञान झाले तर अहंकार होतो, मी हे केले ते केले असे कधीच सांगू नका. तू काहीच केले नाही तर तुमच्याकडून हे काम देवाने करून घेतले आहे. हा सप्ताह जाखुरीकरांनी केला असे नाही तर हे काम गगनगिरी महाराज यांनी करून घेतले. हा सप्ताह मी केला असे कधीही म्हणू नका गगनगिरी महाराजांनी सर्व अहंकार दूर केला म्हणून ते विश्वविभूषित झाले. शास्त्रकृपा, गुरूकृपा, ईश्वरकृपा, अंतःकरण एवढ्या कृपा गगनगिरी महाराजांच्या अंगी होत्या म्हणूनच ते संत झाले.

यावेळी दहीहंडी फोडण्याचा मान इंदुरीकर महाराज यांनी गगनगिरी महाराजांचे परमभक्त कपिल पवार यांना दिला. उपस्थितांचे स्वागत सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन पोपट महाराज आगलावे यांनी केले तर आभार संजय महाराज देशमुख यांनी मानले. सप्हाच्या सांगता प्रसंगी संगननेर तालुक्यातील हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली.

संजय देशमुख नव्हे तर आता संजयगिरी महाराज

संगमनेर तालुक्यातील पिपरणे येथील गगनगिरी महाराजांसाठी सर्वस्वी वाहून घेतलेले परमभक्त संजय महाराजदेशमुख या नावाने न संबोधता त्यांना इथून पुढे संजय गिरी महाराज या नावाने संबोधले जाईल अशी घोषणा त्रिंबकेश्वर येथील जुन्या आखाड्याचे ठाणापती विष्णूगिरी महाराज आणि शकरांनंदगिरी महाराज यांनी स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सांगता प्रसंगी जाखुरीत केली.

हेही वाचा

पाणी मागणी अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या; माजी आ. स्नेहलता कोल्हे यांची पाटबंधारेकडे मागणी

श्रावणाच्या प्रारंभी त्र्यंबकला उसळली भाविकांची गर्दी

अकरा महिन्यांनंतर बुमराहची गोलंदाजी

Back to top button