पाथर्डी तालुका : 85 हजारांचा लॅपटॉप, मोबाईल केला परत! | पुढारी

पाथर्डी तालुका : 85 हजारांचा लॅपटॉप, मोबाईल केला परत!

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मोहरी येथील इरफान यासीन पठाण यांनी प्रमाणिकपणा दाखवत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा हरवलेला लॅपटॉप आणि मोबाईल संच परत केला. ओमकार चौधरी हा अभियांत्रिकी पदवीचे उच्च शिक्षण पुणे येथे घेत असून, राहुरी बसस्थानकातून हरवलेले 85 हजार रुपये किमतीचे लॅपटॉप,मोबाईल संच इरफानने परत करुन प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवला. चौधरी याचा प्रवासादरम्यान राहुरी बसस्थानकात चोरट्यांनी लॅपटॉप, मोबाईल व शैक्षणिक साहित्य असलेल्या पिशव्या पळविल्या.चोरी गेलेल्या साहित्याचा शोध लागत नसल्याने ओमकार व त्यांचे कुटुंबीय व्यथित झाले होते.

अभियंता इरफान पठाण यांना काही लोक रस्त्यावर लॅपटॉप व शैक्षणिक साहित्य असलेली पिशवी किरकोळ किमतीला विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संशय आल्याने इरफान यांनी लॅपटॉप तपासता, त्यात ओमकार चौधरी यांचे ओळखपत्र आढळले. त्यामुळे अभियंता इरफान पठाण यांनी तत्काळ त्या लोकांकडून तो लॅपटॉप व मोबाईल तसेच शैक्षणिक साहित्य असलेली पिशवी विकत घेतली. पाथर्डी पोलिसांना याबाबत कल्पना दिली. इरफानने ओमकार चौधरी यांच्या पत्त्यावर संपर्क केला आणि लॅपटॉप व मोबाईल पाथर्डीचे पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांच्या हस्ते इरफानने ओमकार चौधरी यांच्या वडिलांकडे परत दिली. यावेळी सहाय्यक फौजदार नितीन दराडे, अ‍ॅड.हरिहर गर्जे, भागवत नरोटे, हारूण मनियार उपस्थित होते.

हेही वाचा

अहमदनगर : मोहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

अहमदनगर : मुख्यालयाची अट शिथिल होणार

अहमदनगर : विश्वजीत कासार टोळीला पुन्हा मोक्का

Back to top button