अहमदनगर : मोहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

अहमदनगर : मोहरम विसर्जन मिरवणूक शांततेत
Published on
Updated on

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या नगरच्या मोहरमनिमित्त शनिवारी (दि.29) काढण्यात आलेली विसर्जन मिरवणूक, तसेच नवमीनिमित्त शुक्रवारी (दि.28) रात्री काढलेली कत्तलची रात्र मिरवणूक शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन्ही मिरवणुकीदरम्यान जिल्हा पोलिस दलाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. शुक्रवारी शहरातील कोठला परिसरात मोहरम निमित्त सर्वधर्मिय समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. रात्री 12 वाजता कोठला येथील छोटे बारा इमाम यांची सवारी उठल्यानंतर कत्तलची रात्र मिरवणुकीस प्रारंभ झाला. मंगलगेट हवेली येथून मोठे बारा इमाम यांची सवारी उठली.

कत्तलची रात्र मिरवणूक कोठला राज चेंबर, कोंड्यामामा चौक, दाळमंडई, कापडबाजार, मोची गल्ली, भिंगारवाला चौक, दादा चौधरी शाळा, कोर्टाची मागील गल्ली ते पंचपीर चावडी, बांबू गल्ली, हातमपुरा, रामचंद्र खुंट, इदगाह मैदान मार्गे कोठला येथे शनिवारी (दि. 29) सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी ही सवारी परत आपल्या जागेवर बसविण्यात आली. यावेळी अनेक भाविक टेंभे घेऊन कोठला परिसरात आले होते.

मिरवणूक मार्गावर पोलिसांनी बॅरिकेटींग करत चोख बंदोबस्त ठेवला होता. सवारी छोटे बारा इमाम मंगलगेट याठिकाणी आली असता मोठे बारा इमाम यांची सवारी पारंपरिक पद्धतीने उठविण्यात आली. संपूर्ण शहरात छोटे बारा इमाम यांची मिरवणूक काढण्यात आली होती. शनिवारी मोहरम विसर्जन मिरवणुकीला दुपारी बारा वाजता शहरातील कोठला व मंगलगेट हवेली येथून प्रारंभ झाला. या हुसेन, या हुसेन अशा घोषणा.. सरबताचे वाटप आणि सवारी दर्शनासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात मिरवणूक मार्गस्थ झाली. ताबूत सवारी सोबत आणि मिरवणूक मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कोठला येथून छोटे इमाम हुसेन सवारीने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.

कोठला परिसरात ही सवारी खेळविण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी कोठला परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. मिरवणूक सायंकाळी उशिरापर्यंत पंचपीर चावडी, जुनी महापालिका, सबजेल चौक परिसरात रेंगाळली होती. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मिरवणूक मार्गस्थ झाली. रात्री परंपरेनुसार सावेडी परिसरातील विहिरीत विसर्जन झाले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

कत्तलची रात्र व मोहरम विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली 1100 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनुचित घटना टाळ्णयासाठी मिरवणूक मार्गावर 105 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मिरवणुकीच्या दुतर्फा गल्ली बोळातून समांतर गस्त, टॉवर बंदोबस्त, सवारी बंदोबस्त, सेक्टर बंदोबस्त, सरबतगाडी बंदोबस्त, मोबाईल गस्त व सेक्टर गस्त असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news