नगर: राहुरीत अवैध वाळू वाहणार्‍या वाहनावर कारवाई | पुढारी

नगर: राहुरीत अवैध वाळू वाहणार्‍या वाहनावर कारवाई

राहुरी (नगर), पुढारी वृत्तसेवा: श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने दि. 22 मे रोजी राहुरी शहर हद्दीत वाळू तस्करीवर कारवाई करून सुमारे 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच एका जणाला ताब्यात घेऊन गजाआड केले.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाने श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या पथकातील हवालदार सतीश शंकर पठारे यांनी राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक शिवाजी खरात यांना बरोबर घेऊन वाळू तस्करीवर कारवाई केली.

यावेळी पोलिस पथकाने राहुरी शहर हद्दीतील नगर- मनमाड राज्य महामार्गावर मुळा नदीपात्राच्या पुला जवळ 22 मे रोजी पहाटे 1.15 वाजे दरम्यान नाकाबंदी केली असता त्यांना एक अ‍ॅपे रिक्षा वाळू तस्करी करत असताना दिसली. पोलिस पथकाने कारवाई करून एमएच 16 एई 187 क्रमांकाची 70 हजार रुपए किमतीची अ‍ॅपे रिक्षा व 3 हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू असा एकूण 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच वाळू तस्करी करणारा हारून सय्यद याला ताब्यात घेऊन गजाआड केले. पोलिस हवालदार सतीश शंकर पठारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी हारुन इस्माईल सय्यद (वय 40, रा. कोळीवाडा, ता. राहुरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Back to top button