कोपरगाव बाजार समिती : सभापती कोल्हे, तर उपसभापती पद काळे गटाला | पुढारी

कोपरगाव बाजार समिती : सभापती कोल्हे, तर उपसभापती पद काळे गटाला

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कोल्हे गटाचे साहेबराव रोहोम तर उपसभापतीपदी काळे गटाचे गोवर्धन परजणे यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे व आ. आशुतोष काळे यांनी दोघांचे अभिनंदन केले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सहाय्यक निबंधक नामदेवराव ठोंबळ तर अध्यक्षस्थानी कृषीरत्न दत्तात्रय कोल्हे होते. सभापती पदासाठी रोहोम यांच्या नावाची सुचना संचालक प्रकाश गोर्डे यांनी केली तर संचालक साहेबराव लामखडे यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक बाळासाहेब गोर्डे, शिवाजीराव देवकर, लक्ष्मण शिंदे, संजय शिंदे, मिराताई सर्जेराव कदम, माधुरी विजय डांगे, खंडेराव फेफाळे, राजेंद्र निकोले, रावसाहेब मोकळ, अशोक नवले, रामदास केकाण, रेवणनाथ निकम, ऋषीकेश सांगळे, रामचंद्र साळुंके उपस्थित होते.

निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती रोहोम व उपसभापती परजणे यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बिपीनराव कोल्हे म्हणाले, बाजार समिती ही शेतकर्‍यांसह तालुक्याची कामधेनु आहे. त्यात राजकारण आणायचे नाही, ही माजीमंत्री स्व. शंकरराव काळे व स्व. शंकरराव कोल्हे यांची शिकवण असल्याने सर्वांच्या हितासाठी हा निर्णय घेतला. त्यास आ. आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, पोहेगाव पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन औताडे व सभासद शेतकर्‍यांनी मोलाचे सहकार्य केले.

नवनिर्वाचित संचालक मंडळाने शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्यासह सर्व घटकांना बरोबर घेवुन कोपरगाव बाजार समितीच्या उन्नतीसाठी काम करावयाचे आहे. कुठल्याही प्रकारचे गटा-तटाचे राजकारण न आणता कारभार करून जिल्ह्यासह राज्यात कोपरगाव बाजार समितीचा नावलौकीक वाढवावा. माजी सभापती व उपसभापती व संचालक मंडळाने केलेल्या कार्याचा गौरव बिपीनराव कोल्हे यांनी केला.

यावेळी अरूणराव येवले, त्रंबकराव सरोदे, विश्वासराव महाले, शिवाजीराव वक्ते, बापूसाहेब सुराळकर, कृष्णा परजणे, कोसाकाचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे, मच्छिंद्र टेके, नानासाहेब गव्हाणे, प्रदिप नवले, संदीप देवकर, सुनिल देवकर, राजेंद्र देवकर, हेमंत निकम, सतिष बोरावके, प्रशांत वाबळे, अनिल चरमळ, बाबासाहेब महाले, विश्वास बोळीज, दिपक चौधरी, विक्रम पाचोरे, धरम बागरेचा, देवेंद्र रोहमारेंसह पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी व बाजार समितीचे अधिकारी उपस्थित होते. सचिव नानासाहेब रणशुर यांनी आभार मानले.

दै. पुढारीचे वृत्त तंतोतंत खरे!

‘कोल्हे गटाचे सभापती तर उपसभापती काळे गटाचे’, असे वृत्त दैनिक पुढारीने प्रकाशित केले होते, ते तंतोतंत खरे ठरले. अडीच वर्षे कोल्हे गटाचे सभापती तर उपसभापती काळे गटाचे, पुढील अडीच वर्षे काळे गटाचे सभापती तर उपसभापती कोल्हे गटाचे राहणार आहे.

भाजपाचा तालुकाध्यक्ष म्हणून काम केल्याच्या अनुभवातुन बाजार समितीचा सभापती होण्याची संधी युवा नेतृत्व व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली. सभासदांनी जो विश्वास टाकला, त्या संधीचे निश्चितच सोने करू.

                                                   – साहेबराव रोहोम,
                                                    नवनिवार्चित सभापती

Back to top button