नगर : दुकानासमोरून चारचाकी वाहनाची केली चोरी | पुढारी

नगर : दुकानासमोरून चारचाकी वाहनाची केली चोरी

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी शहरातून आठवड्यापूर्वी एरटीगा चारचाकी वाहन चोरीचा तपास अपूर्ण असतानाच दुकाना समोर लावलेली मारूती 800 कार अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द येथे 4 मार्च रोजी घडली. या घटनेबाबत अज्ञात इसमा विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फारुक फिरोज पठाण (वय 40) हे राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील मातोश्री नगर येथे राहत आहेत. जुने बस स्थानक परिसरात त्यांचे फारुक गॅस वेल्डीग डेंटिग पेटिंग नावाचे दुकान आहे. दिनांक 3 मार्च रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास फारूक पठाण यांनी त्यांचे दुकान बंद केले.

त्यावेळी त्यांनी त्यांची राखाडी रंगाची मारुती कंपनीची 800 मॉडेलची कार नं. एम. एच. 12 ए. एक्स. 8527 ही गाडी त्यांच्या दुकाना समोरील पडवीत लावली होती. रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची कार चोरून नेली. दिनांक 4 मार्च रोजी सकाळी फारूक पठाण हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांची कार चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेनंतर फारूक पठाण यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुरीतून दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

Back to top button