नगर : पाचेगावात महिलेस मारहाण; गुन्हा दाखल | पुढारी

नगर : पाचेगावात महिलेस मारहाण; गुन्हा दाखल

नेवासा/ कुकाणा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे एका महिलेस गज, लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत जखमी महिलेस उपचारासाठी नगरच्या सरकारी रुग्णलयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी नेवासा पोलिसांत पाचजणांविरोधात गुन्हा नोंदवत दोघांना अटक करण्यात आली. डनियल शालमन देठे याला पतीने बदनामी का करतो?, अशी विचारणा केली असता शिवीगाळ, दमबाजी केली. नातेवाईकांनी डनियल शालमन देठे यास बदनामीबाबत विचारले असता त्याने नातेवाईकांसोबत गैरवर्तन केले.

सुनील शालमन देठे, कमलबाई शालमन देठे, मानियल शालमन देठे, शामबेल शालमन देठे (सर्व पाचेगाव ता. नेवासा) यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. डोक्यात गज लागल्याने फिर्यादी महिला गंभीर जखमी झाली आहे. मारहाणीत फिर्यादी महिलेचे मंगळसूत्र तुटून गहाळ झाले आहे. दरम्यान,मारहाणीत जखमी झालेल्या महिलेला प्रथम ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी नगर येथे सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत नेवासा पोलिसांनी पाचजणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सुनील शालमन देठे व मानियल शालमंन देठे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.ू

Back to top button