चिचोंडी पाटील येथे सहा जुगार्‍यांना अटक | पुढारी

चिचोंडी पाटील येथे सहा जुगार्‍यांना अटक

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील डाक बंगल्यात सुरु असलेल्या जुगारावर छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, 5 मोबाईल, 6 मोटारसायकल व रोख रक्कम, असा 1 लाख 76 हजार 780 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पेट्रोलिंग दरम्यान तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप याना खबर्‍याकडून या ठिकाणी जुगार सुरू असल्याचे माहिती मिळाली होती.

त्यांनतर सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गिरीश महादेव कोकाटे, संजय रामराव शिंदे, गणेश सर्जेराव वाडेकर, नामदेव पांडुरंग खराडे, तात्या रामराव पवार, सुभाष बापूराव दानवे, दिगंबर पांढरे, रवि पवार यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सानप यांच्यासह सहाय्यक फौजदार कैलास इथापे, हवालदार धर्मराज पालवे, रावसाहेब खेडकर, पोलिस नाईक रमेश शिंदे, कॉन्स्टेबल नीलेश खिळे यांनी ही कारवाई केली.

Back to top button