नगर : सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्याची मागणी | पुढारी

नगर : सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्याची मागणी

नगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील भविष्य निर्वाह निधी योजना लागू नसलेल्या डीसीपीएस/एनपीएस धारक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोग फरकाचा दुसरा व तिसरा हप्ता देण्याची मागणी डीसीपीएस धारक शिक्षकांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जि.प. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना वैभव सांगळे, सचिन कोटमे, सुशील नन्नवरे, कविराज बोटे, अरुण इघे यांनी दिले.

सदर प्रश्नाबाबत शिक्षकांच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी कडूस यांच्याशी चर्चा केली. शिक्षणाधिकारी यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन वेतन पथक अधीक्षिका स्वाती हवेले यांच्याशी चर्चा घडवून आणली. पुढील महिन्यात ऑनलाईन दुसयर्‍या हप्त्याची तरतूद केली जाईल व शाळेच्या 2019-20 च्या डीसीपीएसच्या राहिलेल्या पावत्या देण्यात येणार आहेे.

Back to top button