नगर : वाळू, मुरुमातील ‘पुष्पा’ला रोखणार कोण?; वनपरिक्षेत्रात ‘रात्रीस खेळ चाले | पुढारी

नगर : वाळू, मुरुमातील ‘पुष्पा’ला रोखणार कोण?; वनपरिक्षेत्रात ‘रात्रीस खेळ चाले

श्रीरामपूर : सागर मा. दोंदे : राहुरी तालुक्याच्या पश्चिमेला दरडगाव थडी, शेरी चिखलठाण, सुतरमळई येथील वनविभागाच्या वनपरिक्षेत्रात अवैद्य वाळूतस्करी होत असताना आता तर चक्क म्हैसगाव वनपरिक्षेत्रात ‘पुष्पा’ कडून बेकायदेशीररित्या मुरूम उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने वनविभागाच्या पथकाने धडक कारवाई केली. तरीही अधिकार्‍यांसमोर ‘झुकेगा नही साला’ अशा भूमिकेत ‘पुष्पा’ वावरत आहे. केवळ अवैध मुरूमच नाही, तर वाळूतस्करीतील ‘पुष्पा’ला रोखणार कोण? असा सवाल जनसामान्यांतून उमटू लागला आहे.

हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, शिंदेंच्या शपथविधीनंतर उद्धव ठाकरेंचा दावा

राहुरीच्या पश्चिम भागात अवैध धंदे सुसाट वेगाने मार्गक्रमन करत आहे. राहुरी पोलिस व महसूल प्रशासन ‘तेरी भी चूप, अन् मेरी भी चूप, कोणाला काही सांगू नका’ या भूमिकेत वर्षानुवर्षे पहावयास मिळत आहे. अवैध धंद्यामुळे गावागावांत हाणामार्‍या व जीवघेणे हल्ले वाढत चालले आहेत. त्यामुळे ग्रामीण भाग गुन्हेगारीचे केंद्र बनत चालले आहेत. अवैध दारू विक्री, मुरूम, वाळूउपसा यांच्यामुळेच गुन्हेगारीला बळ मिळत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

नुपूर शर्मानं टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, वादग्रस्त वक्‍तव्यप्रकरणी सुप्रीम कोर्टानं फटकारलं

गेल्या वर्षी राहुरीच्या पश्चिमेला असणार्‍या शेरी चिखलठाण येथील वनपरिक्षेत्रातील गट नंबर233 व गट नंबर 60 मधून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला होता. तरीही वनपरिक्षेत्रातून वाळूतस्करी ‘पुष्पा’कडून कमी होताना दिसली नाही. ‘त्यां’च्या वरदहस्ताने ‘पुष्पा’ डोईजड झाल्याचे दिसून येत असताना आता चक्क म्हैसगाव वनपरिक्षेत्रातून अवैध मुरूम उत्खननाचा ‘रात्रीस खेळ चालला आहे’.

 मी पळपुटा नाही म्हणत संजय राऊत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर 

यापूर्वीही म्हैसगावच्या अनेक भागातून अवैध मुरूम उत्खनन केले असल्याचेही नागरिकांत बोलले जात आहे. जेसीबीने वाळू व मुरूम उत्खनन करून ट्रॅक्टर साहाय्याने विक्री केली जात आहे. शासनाच्या कोणत्याही मालमत्तेची रितसर परवानगी न घेता बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करत असतात. त्यातून बेसुमार आर्थिक उलाढाल करून स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात.

त्या ‘पुष्पा’कडे दुर्लक्ष का

मात्र, वनपरिक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन होत असताना ‘त्या पुष्पा’कडे दुर्लक्ष का केले जाते. हा वनविभागाचा गोरखधंदा चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष संशयास्पद आहे, तर राहुरीच्या प्रशासनाचे अवैध धंदे करणार्‍यांसोबत हितसंबंध व अवैध वाळू – मुरूम वाहतूक करणारे चारचाकी वाहने ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेरेत सहजपणे कैद झाले असल्याचेही ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष भारतीय जनता पक्षात होणार विलीन

काल (दि.30) पहाटे पाचच्या सुमारास म्हैसगाव वनपरिक्षेत्रातून जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरूम उत्खनन सुरू असल्याचे गुप्त खबर्‍याने वनविभागाच्या अधिकार्‍यांना कळविले. त्यांनतर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी आपला ताफा राहुरीच्या पश्चिम दिशेने मार्गस्थ केला. प्रशासनाची वाहने येताच प्रशासन आणि ‘पुष्पा’ यांच्यामध्ये ‘चोर-पोलिसांचा खेळ’ सुरू झाला. बराच काळ लोटल्यानंतर हा खेळ संपुष्टात आला आणि ‘पुष्पा’वर धाड टाकली. यावेळी वनविभाग प्रशासनांनी जेसीबीसह इतर वाहने हस्तगत केली आहे. मुरूम उत्खनन करणारे ‘पुष्पा’ राजकीय नेत्यांचा सहारा घेऊन प्रकरण मिटवण्याच्या तयारीत असल्याचेही एका ग्रामस्थानी सांगितले होते. मात्र, वन अधिकारी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ‘पुष्पा’वर गुन्हा दाखल केला.

Gold Price : सोने महागणार! आयात शुल्कात केंद्र सरकारकडून वाढ

अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे

गुरुवारी (दि.30) सकाळी पहाटे पाचच्या सुमारास मुरूम उत्खनन करणार्‍यांवर वनविभाग प्रशासनाने कारवाई करूनही संबंधित अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. प्रत्येक कर्मचारी स्वतःची जबाबदारी झटकून उडवाउडवीची उत्तरे देत होते.

अखेर मुरूम चोरणार्‍या ‘पुष्पा’वर गुन्हा

म्हैसगाव येथील 37-38 या राखीव वनपरिक्षेत्रामध्ये जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैधरित्या मुरूम उत्खनन करणार्‍या दोन जणांवर रेंज गुन्हा क्रमांक इ-3,22-23 च्या प्रथम अहवालानुसार भारतीय वनअधिनियम 1927 नुसार 26(1) व 42(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे- फडणवीस सरकारची बहुमत चाचणी सोमवारी

Back to top button