कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष भारतीय जनता पक्षात होणार विलीन | पुढारी

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष भारतीय जनता पक्षात होणार विलीन

पुढारी ऑनलाईन: पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि माजी काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन होणार आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच गेल्या वर्षी अमरिंदर सिंग यांनी नवा पक्ष स्थापन केला होता. कॅप्टन यांचे वय 80 वर्षे आहे. तसेच सत्तर वर्षे वय असलेल्या व्यक्तीला भाजपमध्ये तिकीट दिले जात नाही, त्यामुळे कॅप्टन अमरिंदर यांनी वेगळा पक्ष काढला.

यापूर्वी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला होता. पक्षाचे विलीनीकरण केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना नवीन ऑफर मिळू शकते. उपराष्ट्रपतीपदासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव दिले जाऊ शकते अशी चर्चा आहे.

अमरिंदर सिंग पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया करून लंडनहून परतल्यानंतर त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते. अमरिंदर सिंग यांनी गेल्या वर्षी काँग्रेस सोडल्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि राज्यमंत्री सुनील जाखड यांच्यासह राजकुमार वेरका, सुंदर श्याम अरोरा, बलबीर सिंग सिद्धू आणि गुरप्रीत सिंग या अन्य चार नेत्यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Back to top button