Gold Price : सोने महागणार! आयात शुल्कात केंद्र सरकारकडून वाढ | पुढारी

Gold Price : सोने महागणार! आयात शुल्कात केंद्र सरकारकडून वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : विदेशी चलन साठ्याचे कमी होत असलेले प्रमाण तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोन्याच्या आयात (Gold Price) शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोन्याची मागणी कमी व्हावी, या उद्देशाने आयात शुल्क वाढविण्यात आले आहे. दरम्यान, सरकारने पेट्रोल, डिझेल तसेच विमानाच्या इंधनावरील निर्यात करात (एटीएफ) वाढ केली आहे.

(Gold Price) आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर देशातंर्गत बाजारपेठेतील सोन्याच्या दरात वाढ होणे अटळ मानले जात आहे. सोन्याच्या आयातीवरील बेसिक इंपोर्ट ड्युटी याआधी साडेसात टक्के इतकी होती, ती आता 12.5 टक्क्यांवर गेली आहे. सोन्याची जगातली दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जाते. देशातंर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी देशाकडून सोन्याची आयात केली जाते. आयात बिल वाढण्यात सोने मोठ्या प्रमाणात हातभार लावते, ते यामुळेच. गतवर्षीच्या सोने आयातीच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर त्यावर्षी सोन्याची विक्रमी आयात झाली होती.

दरम्यान, सरकारने पेट्रोल, डिझेल तसेच विमानाच्या इंधनावरील निर्यात करात प्रति लिटरमागे सहा रुपयांनी वाढ केली आहे. हा कर आता 13 रुपयांवर गेला आहे. दुसरीकडे घरगुती कच्च्या तेलावर टनामागे 23 हजार 230 रुपये इतका अतिरिक्त कर लावण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button