नगर: संस्थाचालकांवर कारवाई करावी | पुढारी

नगर: संस्थाचालकांवर कारवाई करावी

नगर, पुढारी वृत्तसेवा: शिरापूर येथील अभिनव विद्यालय सहशिक्षक संतोष सिनारे व राम कनिंगध्वज या शिक्षकांनी संस्था चालकांच्या मानसिक व आर्थिक छळाविरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे. काल शुक्रवारी या उपोषणाचा दुसरा दिवस होता. यावेळी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा शिक्षक परिषद, जुनी पेन्शन संघटना आदी शिक्षक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

याप्रसंगी शिक्षकांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवताना अप्पासाहेब शिंदे यांनी संबंधित संस्थाचालकांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. तसेच शिक्षकांचे आर्थिक नुकसानाचीही भरपाई करून मिळावी, असाही सूर त्यांनी आळवला. बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, बाळासाहेब निवडूंगे, बद्रिनाथ शिंदे, भाऊसाहेब जिवडे, दिलीप बोठे, एस. जी. ठाणगे, झावरे, अर्जुन भुजबळ, एस. बी. शिंदे, अ‍ॅड नितीन पोळ आदींनी उपोषणकर्ते सिनारे आणि कनिंगध्वज यांची विचारपूस करून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.

हेही वाचा:

‘तुम्ही कोविड डोस घेतला का? अशी विचारणा करत महिलेच्या गळ्यातील दागिने चोरले

नगरमध्ये मोबाईल व्हेटरनिटी क्लिनिक! सीईओ येरेकर; गोवंश पालकांना सेवा देण्याचा संकल्प

Back to top button