‘तुम्ही कोविड डोस घेतला का? अशी विचारणा करत महिलेच्या गळ्यातील दागिने चोरले | पुढारी

‘तुम्ही कोविड डोस घेतला का? अशी विचारणा करत महिलेच्या गळ्यातील दागिने चोरले

नगर, पुढारी वृत्तसेवा: नगर शहरातील सिव्हिल हडको येथील वैष्णवी माता मंदिरजवळ ‘तुम्ही कोविड डोस घेतला का?, अश विचारणा करत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले. गुरुवारी ९ जून दुपारी ही घटना घडली.

वत्सला मुरलीधर लाटे (रा. वैष्णवी माता मंदिराजवळ, क्रांती चौक, सिव्हील हाडको, नगर) यांच्या फिर्यादीवरून चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चार अनोळखी व्यक्ती घरात घुसल्या. कपाटातील 55 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button