नेवासा तालुक्यात ऊसउत्पादक वळाला पांढर्‍या सोन्याकडे! | पुढारी

नेवासा तालुक्यात ऊसउत्पादक वळाला पांढर्‍या सोन्याकडे!

नेवासा : पुढारी वृत्तसेवा

मागील वर्षी कापसाला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे, यावर्षी कपाशी लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला दिसतो. जिल्ह्यात कमी प्रमाणात अवकाळी पाऊस पडला असला, तरी यंदा मान्सून लवकर येत असल्याने शेतकरी शेती मशागतीला लागला आहे. शेतातील या कामांना वेग आल्याचे परिसरातील चित्र आहे.

नेवासा तालुक्यात खरीप हंगामाच्या तयारीला गती आली असून, शेतीच्या पूर्व मशागतीमध्ये शेतकरी गुंतला आहे. शेतकर्‍यांना आता पावसाचे वेध लागले आहेत. दरम्यान, यावर्षी मान्सून वेळेवर दाखल होवून दमदार पाऊस पडण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविल्याने शेतकर्‍यांमध्ये नवचैतन्य आहे.

उसाच्या पाठोपाठ नगदी पीक म्हणून कपाशी पिकाकडे पाहिले जाते; मात्र उसाची तोडणीअभावी फरफट पाहता शेतकर्‍यांनी खोडवा किंवा त्यानंतर उसाचे पीक न घेता त्याऐवजी कपाशीसाठी तयारी सुरू केली आहे, तसेच कपाशीचे बियाणे शासनाने मुबलक प्रमाणात वेळेवर उपलब्ध करून दिले आहे.

बेळगाव : निकृष्ट बियाणांवर भरारी पथकांची नजर

काहींनी बियाणे खरेदी केले, तर काहींनी मोठ्या प्रमाणावर आगास कपाशीच्या लागवडी सुद्धा केल्याचे समजते. काही पाऊस पडल्यानंतर वातावरणातील उष्णता कमी होण्याची वाट पहात आहेत.उसाची वाताहत झाल्याने शेतकरी भुसार पिकाकडे वळला असला, तरी मका, सोयाबीनवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तो कपाशीला प्राधान्य देत पूर्वमशागतीची कामे करण्यास शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. बाजारभावाने व निसर्गाने चांगली साथ दिली, तर यावर्षी पांढर्‍या सोन्यामुळे बळीराजाला नक्कीच अच्छे दिन येण्याचे संकेत आहेत.

सध्या मान्सूनपूर्व खरिपाच्या पिकांसाठी मशागती झाल्या असून, काही शेतकर्‍यांनी रोहिणी नक्षत्रापूर्वीच पेरण्याचा श्रीगणेशा केला आहे. यंदा पावसाळी हंगामही जोरदार राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शेत नांगरणी, रोटा करून सर्‍या पाडण्याचे काम सुरू आहे. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहे. पाऊस वेळेवर येण्याच्या आशेने आता बळीराजा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.

मागील वर्षापासून ऊस शेती तोट्यात गेल्याने आता शेतकर्‍यांनी उसाच्या शेतीकडे पाठ फिरवली. पर्यायाने तालुक्यात बहुतांश ठिकाणी उसाचे क्षेत्र घटले. यावर्षी कपाशीच्या क्षेत्रात वाढणार आहे. शेतकरी कपाशी बियाणांची विचारपूस करताना दिसत आहेत.

पालखीमार्गांवर 2400 शौचालये

पावसानंतरच लागवड करावी : डमाळे

कृषी विभागाची पथके तयार आहेत. शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये, शेतकर्‍यांचे नुकसान न होण्यासाठी शेतकर्‍यांनी जूनमध्ये पाऊस झाल्यानंतरच कपाशी लागवड करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांनी केले.

ज्यादा दरामुळे कपाशीकडे ओढा

कांद्याला दर नसल्याने कांद्याने रडविले, तर ऊसतोडणीला विलंब झाल्याने आता पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्‍या कपाशी लागवडीकडे शेतकरी वळले आहेत. कमी खर्चात हमखास पीक व गेल्या वर्षी 10 हजारांच्यावर दरामुळे कपाशीकडे पाहिले जात आहे.

उसाच्या तिरीकडेही शेतकर्‍यांचा कल !

नेवासा तालुक्यात उसाच्या क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. ऊसतोडणीला उशीर झाल्याने शेतकर्‍यांनी मोडतोडीला व मशागतीचा खर्च परवडणार नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी तिरी ऊस ठेवण्यातच धन्यता मानली आहे.

हेही वाचा 

सोलापूर : लक्ष्मी बँकेला सहकार खात्याचा दिलासा

‘राज्यातील शेतकरी, कामगारांना पेन्शन मिळावी’

विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्नशील : नीलेश राणे

Back to top button