जिल्ह्याला 753 कोटींचा निधी मंजूर; नियोजनचा निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी: मुश्रीफ | पुढारी

जिल्ह्याला 753 कोटींचा निधी मंजूर; नियोजनचा निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी: मुश्रीफ

नगर : पुढारी वृत्तसेवा

यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 753 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेली विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून त्यासाठी मंजूर केलेला निधी पूर्णपणे खर्ची पडेल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे मंजूर करण्यात आलेला निधी आणि करावयाची विविध विकास कामे यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित नेहरू सभागृहात सोमवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत चालू वर्षी मंजूर निधी आणि मंजूर कामे यांचा आढावा घेताना पालकमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी बैठकीला खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार नीलेश लंके, समिती सदस्य क्षितिज घुले पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यावेळी उपस्थित होते.

हार्दिक पटेलचं ठरलं ! २ जून राेजी करणार भाजपमध्‍ये प्रवेश

सर्व विभाग प्रमुखांनी मंजूर निधी वेळेतच खर्च होण्यासाठी कामांची तांत्रिक मान्यता, निविदा काढणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची, तसेच योजनांना मंजुरी देताना विविध विभागांनी ताळमेळ ठेवण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
सन 2022-23 आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 453 कोटी 40 लक्ष रुपयांचा मर्यादेत 557 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 144 कोटी आणि आदिवासी उपयोजनेसाठी 47 कोटी 51 लक्ष रुपयांच्या मर्यादेत 52.52 कोटी असा एकूण 753 कोटी 52 लक्ष रुपयांचा नियत मंजूर करण्यात आला.

64 कोटी 60 लक्ष रुपये मंजूर
सन 2022-23 या वर्षासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक 2 साठी 64 कोटी 60 लक्ष रुपये जिल्हा वार्षिक योजनेतून पूर्वनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे 452 किमीचे रस्ते होणार आहेत. सन 2021-22 या वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या 510 कोटी रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च झाला, अनुसूचित जाती उपयोजनेच्या मंजूर 144 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी 99.8 टक्के खर्च झाला, तर आदिवासी उपयोजनेसाठी मंजूर 46 कोटी रुपयांचा निधी 99.7 टक्के खर्च झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे यांनी प्रास्ताविकात जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला निधी आणि खर्चाची माहिती सादर केली. बैठकीला विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

नाशिक : बुडीत ठेवींसाठी मनपा न्यायालयात जाणार

पत्रांचे लाभार्थ्यांना वाटप

कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींना मदतीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शुभांरभ केलेल्या पीएम-केअर फॉर चिल्ड्रेन योजनेतील 44 लाभार्थ्यापैकी प्रातिनिधीक स्वरुपात 5 मुला-मुलींना लाभ पत्रांचे वाटप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

तालुकानिहाय ग्रामसडक किमी

नगर 37.20
पारनेर 49.90
श्रीगोंदा 43.40
जामखेड 20
कर्जत 35
राहुरी 21.20,
नेवासा 36.40,
शेवगाव 30.10,
पाथर्डी 28.70,
संगमनेर 46.10
राहुरी 19.10.
अकोले 40.40,
कोेपरगाव 19.80                                                                                                                                                      श्रीगोंदा 19.70

हेही वाचा

पुणे : ‘व्हीएसआय’मध्ये 4, 5ला साखर परिषदेचे आयोजन

गोवा : वार्कातील ‘धिरयो’वर 20 लाखांचा सट्टा

नाशिक : हनुमान जन्मस्थळाचा चुकीचा प्रचार थांबवा

 

 

 

Back to top button