15 कर्मचारी लाचेच्या जाळ्यात; संगमनेरातून आणखी ‘एक’ भर | पुढारी

15 कर्मचारी लाचेच्या जाळ्यात; संगमनेरातून आणखी ‘एक’ भर

नगर : पुढारी वृत्तसेवा

वेगवेगळ्या कामांसाठी लाच घेताना जिल्हा परिषदेचे 15 अधिकारी, कर्मचार्‍यांना लाचलुचपत विभागाने गत काळात पकडल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात संगमनेरचा बांधकाम विभागातील एक उपअभियंताही लाच घेताना चतुर्भूज झाल्याने या आकडेवारीत आणखी एकाची भर पडली आहे.

लोकसेवक म्हणून काम करताना जनतेची काम करून देण्यासाठी लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे. लाचखोरीत पकडलेल्या कर्मचार्‍यांवर भ्रष्ट्राचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे जिल्हा परिषेच्या विविध विभागांतील 15 कर्मचार्‍यांवर कारवाई झालेली आहे. यात ग्रामपंचायत विभाग लाचखोरीत नंबर एकवर आहे.

नाशिक : हनुमान जन्मस्थळाचा चुकीचा प्रचार थांबवा

या विभागाचे 8 कर्मचारी लाच घेताना पकडलेले आहेत. कारवाईतील 14 कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आलेले आहे, तर एका कर्मचार्‍याला बडतर्फ केलेले आहे. कारवाई झालेल्या संबंधित कर्मचार्‍यांवर कोतवाली पोलिस स्टेशन, राहाता पोलिस स्टेशन, संगमनेर पोलिस स्टेशन, राहुरी पोलिस स्टेशन, सोनई पोलिस स्टेशन, श्रीगोंदा पोलिस स्टेशन, श्रीरामपूर पोलिस स्टेशन, पारनेर पोलिस स्टेशन इत्यादी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

यात 2008 ते 2022 पर्यंतच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यातील बहुतांशी गुन्हे हे मागील पाच वर्षांतील आहेत.
दरम्यान, यातील अनेक कर्मचारी आज न्यायालयाचे हेलपाटे मारत आहेत. अनेकांना न्यायालयाने शिक्षाही सुनावलेली आहे.

नाशिक : अवघ्या दोन महिन्यांत 117 बालकांचा मृत्यू

टक्केवारीला लगाम घाला : वाकचौरे

सध्या झेडपीतील बांधकाम आणि अर्थ विभागात टक्केवारी सुरू आहे. कामे देण्यापासून ते बिले काढण्यापर्यंत अधिकारी कुणालाही न जुमानता यंत्रणेव्दारे ‘मागणी’ करत आहे. यासाठी त्यांनी मर्जीतील कर्मचारी नेमलेले आहेत. सीईओ आशिष येरेकर यांनी या टक्केवारीला लगाम घालावा, अशी मागणी माजी जि.प. सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केली.

विभागनिहाय लाचखोर

विभाग                   कर्मचारी
ग्रामपंचायत                 8
सामान्य प्रशासन          3
बांधकाम विभाग          2
अर्थ विभाग                 1
महिला बालकल्याण     1
शिक्षण विभाग            1

हेही वाचा

पुणे विभागात 15 कोटी लिटर दारूचा ‘फेस’!

पिंपळगावच्या पंपिंग स्टेशनमधून साहित्य चोरी; गुन्हा दाखल करण्याची मागणी

राज्‍यसभा निवडणुकीत भाजपला करायचा आहे घोडेबाजार : संजय राऊत

Back to top button