राज्‍यसभा निवडणुकीत भाजपला करायचा आहे घोडेबाजार : संजय राऊत | पुढारी

राज्‍यसभा निवडणुकीत भाजपला करायचा आहे घोडेबाजार : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन : राज्‍यसभा निवडणुकीसाठी भाजपकडे मते नाहीत. त्‍यांच्‍याकडे मते असती तर संभाजीराजे यांना उमेदवारी दिली असती. आता या निवडणुकीत आपला उमेदवार रिंगणात उतरवून भाजपलाच घोडेबाजारच करायचा आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केली.

मुंबई येथे माध्यमांशी बाेलताना राऊत म्हणाले की, भाजपने संभाजीराजे यांना वाऱ्यावर सोडले. आता त्‍यांनी कोल्हापुरातील दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली आहे. काेणाला उमेदवारी द्‍यावी हा त्‍या पक्षाचा निर्णय आहे. मात्र त्‍यांच्‍याकडे मतेच नाहीत. तरीही केवळ घाेडेबाजार करण्‍याच्‍या हेतूने त्‍यांनी उमेदवार दिला आहे. राज्‍यसभा निवडणुकीत  शिवसेनेने  निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे.  तर भाजपमध्ये राज्यसभा निवडणुकीतील दोन्ही उमेदवार बाहेरचे असल्याने पक्षात नाराजी आहे, असा दावाही त्‍यांनी केला.

उद्धव ठाकरे २५ वर्षे मुख्यमंत्री असतील असा विश्वास व्यक्त करत संभाजीनगराची शिवसेनेची सभा रेकॉर्डब्रेक असेल, असेही राऊत म्‍हणाले.

हेही वाचा : 

Back to top button