दरोड्याच्या तयारीचा प्लॅन फसला; टोळी श्रीगोंद्यात जेरबंद

दरोड्याच्या तयारीचा प्लॅन फसला; टोळी श्रीगोंद्यात जेरबंद

नगर : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील वेठेकरवाडी परिसरात दरोड्याचे तयारीत असलेल्या तिघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून एक कत्ती, एक कटावणी, एक सुरा, मिरचीपूड, दोन मोबाईल व एक दुचाकी असा एक लाख 47 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.

आदिक आजगन काळे (वय 50), समीर आदिक काळे (वय 22 दोघे रा. म्हसणे, ता. पारनेर), आकाश रवींद्र काळे (वय 21, रा. गटेवाडी, ता. पारनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, अंधाराचा फायदा घेऊन वारुद भास्कर चव्हाण, कोक्या भास्कर चव्हाण, सतीष भास्कर चव्हाण, अजय संतोष भोसले (सर्व रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा), राहुल अर्पण भोसले (रा. म्हसणे, ता. पारनेर)
पळून गेले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक श्रीगोंदा तालुक्यातील गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी गस्तीवर असताना पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली, वेठेकरवाडी ते पांढरेवाडी जाणारे रस्त्यावर काही सराईत गुन्हेगार दरोड्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस अंमलदार बबन मखरे, रवींद्र कर्डिले, मनोहर गोसावी, संतोष लोढे, देवेंद्र शेलार, फुरकान शेख, संतोष खैरे, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, जालिंदर माने, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमोल कोतकर, किशोर शिरसाठ व संभाजी कोतकर यांचे पथक तपासासाठी रवाना केले.

पथकाला वेठेकरवाडी ते पांढरेवाडी(ता. श्रीगोंदा) रस्त्यावरील ओढ्याजवळ अंधारात काही संशयित दबा धरून बसल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून वरील तिघांना ताब्यात घेतले. मात्र, अन्य पाच जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

ताब्यात घेतलेल्यांकडून 1 कत्ती, 1 कटावणी, 1 सुरा, मिरचीपूड, 2 मोबाईल व एक दुचाकी असा एकूण 1 लाख 47 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र तुकाराम घुंगासे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news