पुणे विभागात 15 कोटी लिटर दारूचा ‘फेस’! | पुढारी

पुणे विभागात 15 कोटी लिटर दारूचा ‘फेस’!

शिवाजी शिंदे

पुणे : कोरोनानंतर व्यापारासह सर्वच प्रकारचे व्यवहार पूर्वपदावर आल्यानंतर मद्य पिणार्‍यांच्या संख्येतदेखील चांगलीच वाढ झाली आहे. 2022 या वर्षात पुणे विभागातील पुणे, नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातील 50 लाख मद्यपींनी सुमारे 15 कोटी लिटर देशी, विदेशी मद्य आणि बिअर रिचवली असल्याची आकडेवारी पुढे आली आहे.
या बदल्यात या पन्नास लाख मद्यपींनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तिजोरीत 3 हजार 722 कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे.

राज्‍यसभा निवडणुकीत भाजपला करायचा आहे घोडेबाजार : संजय राऊत

मागील वर्षीच्या तुलनेत मद्यपींची ही संख्या सुमारे दहा टक्क्यांनी जास्त आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात मद्याची विक्री वाढली आहे. मागील वर्षी उत्पादन शुल्कच्या पुणे विभागास 3 हजार 382 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यावेळी कोरोनाचे सावट होते. मात्र, ते कमी झाल्यावर यावर्षी मद्य विक्री आणि मद्य घेणा-यांचे प्रमाण वाढ्ले. सोलापूर जिल्ह्यापेक्षा पुणे आणि नगर जिल्ह्यात देशी, विदेशी आणि बिअरच्या विक्रीत अधिक वाढ झाली आहे. या विभागाने बेकायदा मद्य वाहतूक करणारे, अवैधपणे गावठी मद्य काढणार्‍यावर कारवाया करून त्यांना जेरीस आणले आहे.

कुलगाममध्‍ये काश्मिरी पंडित शिक्षिकेवर दहशतवाद्‍यांचा गोळीबार

प्रतिबंधात्मक कारवाई

पुणे विभागात 743 लोकांवर बेकादा मद्य विक्री, उत्पादन केल्याबद्दल प्रतिबंधात्मक कारवाई केली. 2021-22 मध्ये 259, तर 2021-22 मध्ये 443 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. या नागरिकांकडून चांगल्या वर्तणुकीचे बाँड घेतले आहेत. त्यात 2021 मध्ये 35 लाख 50 हजार रुपयांचे, तर 2021-22 मध्ये 77 लाख 77 हजार रुपयांचे बाँड लिहून घेण्यात आले आहेत.

‘सिंचन’चा कृषी सिंचनात काळा बाजार

देशी मद्यविक्री

वर्ष                                               विक्री
2020-21                           4 कोटी 67 लाख लिटर
2021-22                          5 कोटी 32 लाख लिटर

बिअर विक्री

वर्ष                                               विक्री
2020-21                           4 कोटी 5 लाख लिटर
2021-22                           4 कोटी 42 लाख 37 हजार लिटर

हनुमान जन्मस्थळ वाद : नाशिकरोडला आज धर्मसंसद, काय निघणार तोडगा ?

विदेशी मद्यविक्री

वर्ष                                               विक्री
2020-21                         4 कोटी 49 लाख लिटर
2021-22                         5 कोटी 4 लाख 54 हजार लिटर

2021-22 मधील महसूल (रुपयांत)

पुणे    :                                  1871 कोटी
नगर   :                                  1728 कोटी
सोलापूर :                               12 कोटी 21 लाख

Nashik : गिरणारेतून बिबट्याची जोडी जेरबंद

2022 मध्ये 7 हजार 400 गुन्हे नोंद झाले, तर सुमारे 25 कोटी 87 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
या वर्षी गुन्हेगारांना चाप लावीत त्यांच्यावर कारवाई केल्यामुळे गुन्हेगार अटक होण्याची संख्या, तसेच मुद्देमाल जप्त होण्याची आकडेवारी वाढली आहे. तसेच सर्व प्रकारच्या मद्य विक्रीमुळे महसुलात देखील चांगलीच वाढ झाली आहे.

                     – प्रसाद सुर्वे, उपायुक्त – राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग

Back to top button