ओतूर : पुढारी वृत्तसेवा : ओतूर येथून मार्गस्थ झालेला नारायणगाव ते ब्राह्मणवाडा या जिल्हामार्गावर दुतर्फा बंदिस्त गटाराचे काम अत्यंत संथगतीने गेल्या आठ महिन्यांपासून सुरू आहे. त्याचा प्रचंड त्रास ओतूरकर नागरिकांना सोसावा लागत आहे.
ओतूर ग्रामसचिवालय इमारतीसमोर व अगदी मंदिराला खेटून असलेल्या मोठ्या व्यासाच्या या सताड उघड्या चेंबरचे बांधकाम व बंदिस्त चेंबर करण्याच्या कामाला तब्बल सात महिने लागत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असून, चंद्रकांत जाधव या कंत्राटदाराने हे काम घेतल्याचे समजते. चेंबरजवळच कृषी उत्पन्न बाजार समिती उपकेंद्राचे मुख्य प्रवेशद्वार असल्याने येथे अत्यंत वर्दळ असते. या मार्गावरील हा खोल चेंबर रस्त्यालगतच असून, येथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याशिवाय या चेंबरमधून वाहणारे पाणी हे शौचालयाचे पाणी असून, परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. साथीच्या रोगांचा प्रसार करणार्या डासांचे उत्पत्तीस्थान व रोगांचे मुख्य केंद्रस्थान म्हणून हा चेंबर आपली भूमिका पुरेपूर बजावत आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे रावसाहेब उतळे यांना फोनवरून संपर्क केला असता त्यांनी या कामाबाबत मी ओतूर येथे येत असल्याचे कळविले, तर कार्यकारी अभियंता केशव जाधव यांना फोन केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही.
याबाबत दै. 'पुढारी'ने फोनवरून संबंधित ठेकेदारास विचारणा केली असता दि. 7 जूनपूर्वी चेंबरचे काम मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठेकेदार चंद्रकांत जाधव यांना आत्तापर्यंत अनेकदा फोन केलेला असून, ते दरवेळी उद्या कामाला सुरुवात करीत असल्याचेच सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू व्हायला अजून किती वेळ लागणार हे कोणालाही ज्ञात नाही. हे प्रलंबित चेंबरचे काम मार्गी लागावे म्हणून संबंधित ठेकेदारांना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित ढमाले, उपसरपंच प्रशांत डुंबरे यांनीही अनेकदा फोन केले असता, उद्या कामाला सुरुवात करतो, असे ठरलेले उत्तर दिले जात आहे.

हेही वाचा