Nagpur News : “आमची चिंता नको” : मुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसला सल्ला       | पुढारी

Nagpur News : "आमची चिंता नको" : मुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसला सल्ला      

नागपूर पुढारी वृत्तसेवा : आम्ही केवळ घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही,  प्रत्यक्ष फिल्डवर जावे लागते, ते काम आम्ही करीत आहोत. सर्व नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, सर्व कार्यकर्ते फिल्डवर काम करीत आहेत. ग्रासरूटचे आम्ही कार्यकर्ते आहोत. महायुतीची चिंता त्यांनी करू नये, त्यांनी आपल्या घरात काय जळते ते बघावे. तीन तिघाडा अशी महाविकास आघाडीची परिस्थिती निर्माण झाली. दोन प्रादेशिक पक्ष, ज्यांच्याकडे अजेंडा पण नाही आणि झेंडा पण नाही. त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाची काय परिस्थिती करून ठेवली आहे? काँग्रेसने आपला विचार करावा, असा सल्‍ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला दिला आहे. (Nagpur News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेक मतदार संघाच्या दृष्टीने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यासोबतच ते डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच आज (दि.७) रात्री नागपूर लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत.

Nagpur News : खडसे यांची मोदींच्या सभेत घरवापसी!

दरम्यान, उद्या (दि.८ एप्रिल) चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. या सभेला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भाजपमध्‍ये प्रवेश होऊ शकतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही उपस्थिती यावेळी राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button