पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री, आप नेते मनीष सिसोदिया हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज (दि.६) सुनावणी पार पडली. दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिवसभराची सुनावणीनंतर या प्रकरणी बुधवारी (दि.१० एप्रिल) पुढील सुनावणी हाेईल, असे स्पष्ट केले. (Manish Sisodia bail plea)
मनीष सिसोदिया यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला. दुसऱ्या नियमित जामीन याचिकेवर राऊस अव्हेन्यू न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या समोर सुनावणी झाली. ईडीचे विशेष वकील झोहेब हुसेन यांनी आज सिसोदिया यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेला विरोध केला आहे. (Manish Sisodia bail plea)
सिसोदिया हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यापूर्वी दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील ईडी आणि सीबीआय या दोन्ही केसमध्ये सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सिसोदिया यांच्या पुनर्विलोकन याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या. गेल्या महिन्यात त्यांनी ट्रायल कोर्टात नव्याने जामीन अर्ज दाखल केला यावर आजची सुनावणी झाली. (Manish Sisodia bail plea)
दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी 2023 रोजी सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर ईडीनेही त्यांना 9 मार्च 2023 रोजी अटक केली होती.
हेही वाचा: