एमबीए प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर ! 7 जुलैपर्यंत करता येणार नोंदणी | पुढारी

एमबीए प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर ! 7 जुलैपर्यंत करता येणार नोंदणी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने (सीईटी सेल) विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या मुदतीनंतर नोंदणी आणि पडताळणी केलेल्या विद्यार्थ्यांचा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. पसंतीक्रम भरणे व पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत प्रसिध्द केले जाणार असल्याचे सेलकडून स्पष्ट करण्यात आले.

ऑनलाइन पद्धतीने प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जांची निश्चिती करण्याची प्रक्रिया 8 जुलैला संपेल. सात जुलैनंतर नोंदणी व पडताळणी झालेल्या अर्जांचा विचार ‘नॉन कॅप’ जागांसाठी केला जाणार आहे. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना www.mba2023.mahacet.org.in या संकेतस्थळाचा वापर करता येणार आहे.

हेही वाचा:

पुणे: चातकाच्या हालचाली, हीच आमची वेधशाळा; शेतकऱ्यांची भावना

पुणे होणार ईलेक्ट्रीक वाहनांचे हब, बारा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक

पुणे : रेल्वे ट्रॅकवरील रस्त्याला खड्डे ; खडकी परिसरातील स्थिती

 

 

Back to top button