J-K : पुलवामामध्‍ये पोलिस ठाण्‍यावर ग्रेनेड हल्‍ला; दोन पोलिस कर्मचारी जखमी | पुढारी

J-K : पुलवामामध्‍ये पोलिस ठाण्‍यावर ग्रेनेड हल्‍ला; दोन पोलिस कर्मचारी जखमी

श्रीनगर : पुढारी ऑनलाईन
जम्‍मू-काश्‍मीरमधील ( J-K ) पुलवामा जिल्‍ह्यातील एका पोलिस ठाण्‍यावर दहशतवाद्‍यांनी आज ग्रेनेड हल्‍ला केला. या हल्‍ल्‍यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, हल्‍लेखोरांच्‍या शोधासाठी परिसरात नाकाबंदी करण्‍यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. जखमी पोलिस कर्मचार्‍यांवर उपचार सुरु आहेत.

मागील काही महिन्‍यांपासून काश्‍मीर खोर्‍यात ( J-K ) दहशतवादी हल्‍ल्‍यांमध्‍ये वाढ झाली आहे. सर्वसामान्‍य नागरिक, परप्रांतीय कामगारांवर दहशतवादी हल्‍ले करत आहेत. वाढत्‍या हल्‍ल्‍यांमुळे सुरक्षा दलाने नवीन मोहिम हाती घेतली आहे. त्‍यामुळेच दक्षिण काश्‍मीरमध्‍ये मागील २४ तासांत वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्‍यांमध्‍ये झालेल्‍या चकमकीत ‘आयएसजेके’चा दहशतवादी रफीक अमहदसह पाच दहशतवादी ठार झाले आहेत.

रीफक हा जम्‍मू-काश्‍मीर पोलिसमध्‍ये सहायक उप निरीक्षक अशरफ अहमद यांच्‍या हत्‍येतील सूत्रधार होता. शोपियांमध्‍ये शनिवारी झालेल्‍या चकमकीत लश्‍कर-ए-तोयबाचे दहशतवादी ठार झाले होते. या दोघाकडील मोठा शस्‍त्रसाठा पोलिसांनी जप्‍त केला आहे. शुक्रवारी झालेल्‍या चकमकीत भाजप नेत्‍यांच्‍या हत्‍यांमध्‍ये सहभागी असलेल्‍या हिजबुलचा दहशतवादी कुलगाममधील शहजाद सेह याचा खात्‍मा केला होता.

हेही वाचलं का? 

 

Back to top button