ओमायक्रॉन संकट! कर्नाटकात मंगळवारपासून नाईट कर्फ्यू | पुढारी

ओमायक्रॉन संकट! कर्नाटकात मंगळवारपासून नाईट कर्फ्यू

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 40 वर गेल्याने येत्या मंगळवारी 28 डिसेंबरपासून 10 दिवसांसाठी नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय झाला आहे. रविवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला.

बैठकीनंतर माहिती देताना राज्याचे आरोग्य मंत्री के. सुधाकर म्हणाले, राज्यात पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील सुमारे 10 टक्के ओमायक्रॉन रुग्ण कर्नाटकात आहेत. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. राज्यभरात 4 हजार आयसीयू बेड सज्ज आहेत. सगळ्यांवर उपचार केले जातील. रात्री 10 पासून पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहील.

नव्या वर्षाच्या स्वागत सोहळ्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यावर निर्बंध आहेत, हॉटेल, पब मध्ये एकूण क्षमतेच्या 50 टक्केच लोकांना प्रवेश असेल, असेही निर्बंध लावण्यात आले आहेत.

देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या ४२२ वर

देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या ४२२ वर पोहोचली आहे. यात महाराष्ट्रातील १०८, दिल्ली ७९, गुजरात ४३, तेलंगणा ४१, केरळ ३८ आणि तामिळनाडू मधील ३४ रुग्णांचा समावेश आहे. देशातील आतापर्यंत १३० रुग्ण ओमायक्रॉन मधून बरे झाले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button