उत्तराखंड : तरुणीने 'काका' म्हटलं; दुकानदाराने केली बेदम मारहाण | पुढारी

उत्तराखंड : तरुणीने 'काका' म्हटलं; दुकानदाराने केली बेदम मारहाण

उत्तराखंड, पुढारी ऑनलाईन : उत्तराखंड राज्यातील उधमसिंहनगरमधील कोतवाली येथे एका तरुणीने दुकानदाराला ‘काका’ म्हटलं म्हणून त्याला राग आला.  त्याने संबंधित तरुणीला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी जबर होती की, तरुणीला जवळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचंही सांगितलं जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मारहाण झालेली तरुणी ही सितारगंजमधील इस्लामनगर येथील रहिवासी आहे. ही तरूणी बॅडमिंटन बदलण्यासाठी गेली होती. तरुणी दुकानदाराला म्हणाली की, “काका, हे बॅडमिंटन व्यवस्थित नाही. ते बदलून दुसरं द्या”, यावर दुकानदाराला प्रचंड संताप आला. त्याने त्या तरुणीला बेदम मारहाण करण्यास सुरू केली, असा आरोप संबंधित तरुणीने केली आहे.

तरुणीवर उपचार करणारे डाॅ. रविंद्र सिंह म्हणाले की, “ही तरुणी प्रचंड घाबरली आहे. तिला मारहाण करण्यात आली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलीला श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे तिला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे.”

पाहा व्हिडीओ : दिल्लीची प्रसिद्ध जामा मस्जीद नेमकी आहे कशी?

Back to top button