नाशिक : उद्या रंगपंचमी ! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी करण्यात आले असे बदल | पुढारी

नाशिक : उद्या रंगपंचमी ! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी करण्यात आले असे बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रंगपंचमीनिमित्त शहरातील जुने नाशिक व पंचवटी परिसरात पारंपारिक रहाड उत्सव होत असतो. तसेच अनेक ठिकाणी शॉवर डान्सचे आयाेजन केले आहे. त्यामुळे शहरातील जुने नाशिक व पंचवटी परिसरातील वाहतूक मार्गात काही प्रमाणात बदल केले आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भात अधिसुचना काढल्या आहेत.

रंगपंचमीत पेशवेकालीन रहाड उत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानुसार येत्या शनिवारी (दि.३०) होणाऱ्या रंगपंचमीत रहाडींवर नाशिककरांची गर्दी होणार आहे. रंग खेळणाऱ्यांसोबतच बघ्यांची गर्दी होत असल्याने परिसरात वाहतूक कोंडी होते. ती टाळण्यासाठी परिसरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार काही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. शनिवारी (दि.३०) सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा बदल राहणार आहे.

पंचवटीतील वाहतूक मार्ग
पंचवटीतील काळाराम मंदिर ते शनिचौक कडे येणारा रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक म्हणून चालकांना सरदार चौक मार्गाचा वापर करता येणार आहे. तसेच खांदवे सभागृह ते शनिचौक, मालवीय चौक ते शनिचौक व सरदार चौक ते शनिचौककडे येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील. त्यांना पर्यायी मार्ग म्हणून रामकुंड, मालेगाव स्टँड, ढिकले वाचनालय मार्ग असतील.

जुने नाशिकमधील वाहतूक मार्ग
प्रवेश बंद मार्ग असे…
– नेपाळी कार्नर ते गाडगे महाराज पुतळा
– बादशाही कॉर्नर ते बुधा हलवाई दुकान व मधली होळी
– नेहरू चौक ते बुधा हलवाई दुकान
– दुध बाजार ते जुनी तांबट लेन
– हाजी टी पॉईंट ते चौक मंडई ते काझीपुरा पोलिस चौकी
– शिवाजी चौक ते काझीपुरा पोलिस चौकी (दंडे हनुमान मंदिर)
– मिरजकर गल्ली ते काझीपुरा पोलिस चौकी (दंडे हनुमान मंदिर)

पर्यायी मार्ग असे…
– नेपाळी कॉर्नरकडून खडकाळी सिग्नलमार्गे इतरत्र जातील
– दुध बाजार चौकाकडून बादशाही कॉर्नरकडील वाहतूक दुधबाजार चौकाकडून बादशाही कॉर्नर कडे न-जाता इतरत्र मार्गाने जातील
– दुध बाजार चौक ते उमराव मेडीकलकडे जाणारी वाहतूक ही दुधबाजार वाकडी बारव चौक मंडई मार्गे इतरत्र जातील.
– हाजी टी पॉईंटकडून चौक मंडईकडे व इतरत्र जातील
– शिवाजी चौक मार्गे इतरत्र

Back to top button