जळगाव : आता भाजपमध्ये जाणे शक्य नाही- एकनाथ खडसे | पुढारी

जळगाव : आता भाजपमध्ये जाणे शक्य नाही- एकनाथ खडसे

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

ज्या पक्षाच्या वाढीसाठी आम्ही राबलो, त्याच पक्षात माझा छळ झाला. खोटे आरोप करुन अनेक चौकशींना सामोरे जावे लागले. त्यामुळे आता पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आ. खडसेंना घरवापसीची ऑफर दिली आहे. यावर आ. खडसे यांनी आपले मत व्यक्त केले.

याविषयावर आ. खडसे म्हणाले, विनोद तावडे आणि आम्ही गेले अनेक वर्षे भाजपचे काम करत होतो. भाजपमध्ये विनोद तावडेंचे योगदान खूप आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना वाटत असावे की, जुन्या लोकांनी पक्षात यावे. कर्नाटकच्या पराभवावरून त्यांना असे वाटले असावे की, जुन्या नेत्यांनी पक्षात परत यावे असं खडसे यांनी म्हटले आहे. मात्र, ज्या पक्षासाठी इतके केले. 2014 पासून माझा ज्या पक्षात छळ झाला. अनेक चौकशी लावण्यात आल्या त्या पक्षात आता मी पुन्हा जाणार नाही. भाजपमध्ये ज्यांच्यावर मोठे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पक्षात येऊन स्वच्छ झाले. अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मला विधानपरिषदचं सदस्य बनवून राजकीय विजनवासातून बाहेर काढले. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button