जळगाव : ऑईल टँकरच्या धडकेने दोन तरुण जागीच ठार | पुढारी

जळगाव : ऑईल टँकरच्या धडकेने दोन तरुण जागीच ठार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर दुपारी 2 च्या सुमारास ऑइल टँकरच्या जोरदार धडकेने दुचाकीवरील दोन तरुण ठार झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील धमण्या येथील संदीप मानसिंग शिरसाम (24) आणि वसंत मुन्ना वरखेडे (28) हे दोघे एमआयडीसी परिसरातील चटई कारखान्यात कामाला होते. जळगाव येथून भुसावळ येथे हे दोघे रविवारी (दि. 26) दुपारी दुचाकीवरून (एमपी 48 एमआर 5397) चालले होते. नशिराबाद गावाजवळ भरधाव ऑइल टँकर (एमएच 04 डीएस 2217) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघे जागीच ठार झाले. अपघात घडल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तरुणांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे हलविण्यात आले आहे. नशिराबाद पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button