पुढारी ऑनलाईन डेस्क : कडक उन्हाळ्याच्या झळा सर्वांना जणवत आहेत आणि यामुळे नागरिकांचा कल थंडगार पदार्थाकडे वळला आहे. काही- काही कुटूंबात जेवणात काकडी, गाजर, ताक, दही, कोल्ड्रींक्स यासारख्या पदार्थांचा वापर केला जातोय. मात्र, दररोजच जेवणासोबत हे पदार्थ खावून कंटाळा येत असेलच ना! चला तर मग दह्यापासून टेस्टी आणि हेल्दी सॅलेड ट्राय करूयात. यासाठीते कसे बनवायचे जाणून घेऊया… ( Dahi Salad Recipe )
दही- ४ चमचे
मेयॉनीज- २ चमचे
अननस- १ कप
डाळिंबाचे दाणे- १ कप
भाजलेले शेंगदाणे- १ कप
बारीक चिरलेले गाजर- १ कप
द्राक्षे- १ कप
स्वीट कॉर्न- १ कप
मिरपूड- अर्धा चमचा
बारीक चिरलेला कांदा- १ कप
मीठ- चवीनुसार
साखर- चवीनुसार
पाणी
१. पहिल्यांदा एक भांडे घेवून त्यात चिरलेले गाजर आणि स्वीट कॉर्न पाण्यात भिजत ठेवावे.
२. यानंतर हे मिश्रण गॅसवर ४-५ मिनिटांपर्यंत शिजवावे आणि त्यातील पाणी काढून टाकावे.
३. शिजलेले गाजर आणि स्वीट कॉर्न एक भांड्यात घेवून त्यात दही आणि मेयॉनीज घालून चांगले मिक्स करावे.
४. यानंतर डाळिंबाचे दाणे, भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेले अननस आणि कांदा घालून मिक्स करावे.
५. यानंतर साखर, चवीनुसार मीठ आणि मिरपूड घालून हे मिश्रण एकत्रित करावे.
६. तयार झालेले टेस्टी आणि हेल्दी दह्याचं सॅलेड थंड होण्यास फ्रिजमध्ये ठेवावे आणि कुटूंबियांना सेव्ह करावे. ( Dahi Salad Recipe )