Chandrapur News : मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पलटली ; एक ठार, १७ जखमी   | पुढारी

Chandrapur News : मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पलटली ; एक ठार, १७ जखमी  

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राजुरा तालुक्यातील विरुर ते धानोरा मार्गावर ट्रॅव्हल्स पलटी झाली. आज ( दि. २८) झालेल्‍या अपघातात एक जण ठार तर १७ जण जखमी आहेत. चेतन रात्रे असे मृताचे नाव आहे. १७ जखमींपैकी जणांची प्रकृती गंभीर आहे. (Chandrapur News)

हैदराबाद येथे मजुरीकरीता छत्तीसगड, मध्य प्रदेश राज्यांमधून मोठ्या प्रमाणात मजूर जातात.  शुक्रवारी (दि.२७) दुपारी 32 मजुरांना घेऊन धनी कँपनीची ट्रॅव्हल्स हैद्राबादला निघाली होती. आज पहाटे तीनच्‍या सुमारास विरुर ते धानोरा, शिरपूर मार्गावरील धानोरा गावाजवळील वळणावर चालकांचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स पटली झाली. अपघातावेळी मजूर गाढ झोपेत होते. या अपघातात चेतन रात्रे याचा जागीच मृत्यू झाला.

Chandrapur News : ११ जणांची प्रकृती गंभीर  

अपघाताची माहिती विरूर पोलिस ठाण्यात होताच ठाणेदार जयप्रकाश निर्मल, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, राजुराचे ठाणेदार योगेश्वर पारधी यांनी घटनास्थळी धाव घेतली. १७ जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात  दाखल करण्यात आले. किरकोळ जखमी झालेल्‍यांना विरुर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सोडण्यात आले. १७ पैकी ११ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूरला पुढील उपचाराकरीता हलविण्‍यात आले आहे.

संबंधित बातम्या

आरोग्यसेवाचे चालक खुशाल लकडे, स्वप्नील देवतळे, विश्वजित झाडे, रोहित जामदार यांनी अपघातग्रस्‍तांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यासाठी सहकार्य केले. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी राजुरा येथील रुग्‍णालयात  जाऊन जखमींची विचारपूस केली.

हेही वाचा

Back to top button