Pregnancy and obesity : गरोदरपणा आणि स्थूलपणा

Pregnancy
Pregnancy
Published on
Updated on

स्थूलपणा आणि गर्भधारणा यांचा परस्पर संबंध आहे. लठ्ठपणामुळे गर्भधारणेस विलंब होतो. तसेच अधिक वजनाचा इतर संप्रेरकांच्या समतोलावरही परिणाम होतो. कधीकधी मधुमेह देखील होऊ शकतो. मधुमेह असेल, तर अति वजनामुळे लवकर नियंत्रणात येत नाही.

स्थूलपणा हा आयुष्याच्या कोणत्याही अवस्थेत चांगला नसतोच. स्थूलपणामुळे कोणते आजार उद्भवू शकतात, हे अनेकांना ठाऊक असेलच. इतर वेळी जसा स्थूलपणा हा चिंतादायक असतो. तसा तो गरोदरपणीसुद्धा काळजी करण्यासारखा असतो. लठ्ठपणा आणि त्याची व्याख्या करणे थोडेसे किचकट काम आहे. कारण वजन, उंची, वय आणि शरीराच्या इतर समस्या यावर लठ्ठपणाचे प्रमाण ठरवले जाते. प्रगत देशांमध्ये ज्या गरोदर स्त्रियांचे वजन पहिल्या पाच सहा महिन्यांत 90 किलोपेक्षा जास्त आहे, अशा स्त्रियांना लठ्ठ म्हणतात.

भारतात मात्र साधारणपणे स्त्रियांचे वजन 55 ते 62 किलो एवढे असते. म्हणून ज्या गरोदर महिलेचे वजन पहिल्या चार-पाच महिन्यांत 75 किलो पेक्षा जास्त आहे अशा स्त्रियांना लठ्ठ म्हणता येऊ शकते. गर्भधारणेच्या संपूर्ण 9 महिन्यांच्या कालावधीत दहा ते बारा किलो वजन वाढू शकते. त्यामुळे ज्यांचे वजन सुरुवातीलाच 70-75 किलो आहे त्यांचे वजन नवव्या महिन्यात 82 ते 85 किलोपर्यंत जाते.

स्थूलपणा आणि गर्भधारणा यांचा परस्पर संबंध आहे. लठ्ठपणामुळे गर्भधारणेस विलंब होतो. तसेच अधिक वजनाचा इतर संप्रेरकांच्या समतोलावरही परिणाम होतो. कधीकधी मधुमेह देखील होऊ शकतो. मधुमेह असेल तर अति वजनामुळे लवकर नियंत्रणात येत नाही. या सर्व समस्यांमुळेच एखादी स्त्री मूल होत नाही अशी तक्रार घेऊन डॉक्टरांकडे उपचारांसाठी जाते तेव्हा तिला सर्वप्रथम वजन कमी करण्याचे सांगितले जाते. स्थूलपणामुळे काही वेळा वारंवार जंतुदोषही निर्माण होऊ शकतो. हालचालींमध्ये शिथिलता येते. मानसिकरीत्या नैराश्य जाणवते आणि निरुत्साह यांसारख्या समस्या दिसून येतात.

आधीपासूनच एखादी स्त्री स्थूल असेल, तर गरोदरपणी ती अधिकच स्थूल होते. गरोदरपणात भूक वाढते, आहार वाढतो. स्त्रिया चांगले पौष्टिक खातात यामुळे आणखी वजन वाढते. पण, या सर्व गोष्टींचा परिणाम वेगवेगळ्या समस्यांना आमंत्रण देणारा ठरू शकतो. गरोदरपणापूर्वी एखाद्या स्त्रीचा रक्तदाब सामान्य असेल तरी वाढत्या वजनामुळे गरोदरपणी रक्तदाब वाढू शकतो. अतिवजनामुळे गरोदरपणात मधुमेह देखील होऊ शकतो किंवा असलेला मधुमेह अधिक वाढू शकतो. स्थूल आई असेल तर तिला साधारणपणे तिला अधिक वजनाचीच मुले होतात. त्यामुळे स्थूलपणाचा वारसा पुढे सुरूच राहातो. क्वचित लठ्ठ स्त्रीला कमी वजनाचे आणि अपुर्‍या वाढीचे मूल होऊ शकते. अधिक वजन वाढल्यांमुळे पायांवर, हातांवर, चेहर्‍यावर सूज येऊ शकते. अधिक वजनामुळे शारीरिक हालचाल करताना अधिक त्रास होतो. रोजची कामेसुद्धा नकोशी वाटतात, सुस्ती येते, नोकरी करत असल्यास कार्यक्षमता कमी होते.

अधिक वजन असल्यामुळे प्रसूतीच्यावेळी देखील अडचण येऊ शकते. अधिक वजनामुळे बाळाचे डोके बाहेर येण्यास अडचण निर्माण होते. काही वेळा बाळ आडवे किंवा पायाळूही होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक प्रसूती होण्यास अडचण येते.  या समस्यांवर इलाज करायचा असल्यास काही उपाय आणि सल्ले उपयोगात येऊ शकतात. गरोदरपणी वाढलेले वजन प्रसूतीनंतर कमी व्हायला हवे. पण, बरेचदा लठ्ठ स्त्रियांचे वजन प्रसूतीनंतर सुद्धा कमी होत नाही. यावर उपाय म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणे होय.

कुठल्याही स्त्रीने आपले वजन 60 किलोच्या पुढे जाऊ देऊ नये. एखाद्या स्त्रीचे वनज 70 ते 80 किलो असेल तर आधी तिने ते कमी करावे आणि मगच मूल होण्याचा निर्णय घ्यावा. गरोदरपणी अधिक वजन असल्यास आहारावर काटेकोर नियंत्रण ठेवावे. अधिक उष्मांकाचा आहार घेऊ नये. जेवणात पालेभाज्या, सॅलेड, फळे यांचा समावेश करावा. वजन प्रमाणापेक्षा अधिक वाढू देऊ नये. कारण प्रत्येक दहा टक्के वाढलेल्या वजनामुळे गरोदरपणातील धोके देखील वाढत जातात. ते वाढू नये म्हणून नेहमीच वजनावर नियंत्रण ठेवावे आणि त्याद्वारे संभाव्य आजार नियंत्रित करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news