PM Modi: भारत आता थांबणार नाही, तर वेगाने दौडत, वेगळी ओळख निर्माण करेल; पंतप्रधान मोदी | पुढारी

PM Modi: भारत आता थांबणार नाही, तर वेगाने दौडत, वेगळी ओळख निर्माण करेल; पंतप्रधान मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारत आता थांबत थांबत चालणार नाही, तर वेगाने दौडत जगात आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. येत्या ८ ते १० वर्षात भारतीय रेल्वेचा कायापलट करणे हेच आमचे ध्येय असल्याचे मत देखील पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. बंगळूर येथील सभेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरूमध्ये पोहचत पाचव्या वंदे भारत एक्सप्रेस आणि भारत गौरव काशी दर्शन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पीएम मोदींनी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ चे उद्घाटनही केले. आजपासून पंतप्रधान मोदी दक्षिण भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान दक्षिणेकडील चार राज्यांना भेट देणार आहेत. शिवाय त्यांनी याप्रसंगी नादप्रभू केम्पेगौडा यांच्या १०८ फूट पुतळ्याचे अनावरणही केले.

याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले, एका खास दिवशी मी बंगळुरूला पोहोचलो हे माझे भाग्य आहे. आज राष्ट्राच्या दोन महान सुपुत्र संत कनक दास आणि महर्षी वाल्मिकी यांची जयंती आहे. हे मी माझं भाग्य समजतो. या दोघांनाही मी आदरांजली अर्पित करतो. आज सुरू झालेली वंदे भारत ट्रेन ही केवळ ट्रेन नसून, ती न्यू इंडियाची नवीन ओळख आहे. आम्ही बंगळुरूचा विकास आणि वारसा या दोन्हींना अधिक सक्षम करत आहोत. 21व्या शतकात भारताची ट्रेन कशी असेल याची ही झलक असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button