राजू श्रीवास्तव : अति व्यायाम ठरू शकतो जीवघेणा; विश्रांतीही तितकीच महत्त्वाची | पुढारी

राजू श्रीवास्तव : अति व्यायाम ठरू शकतो जीवघेणा; विश्रांतीही तितकीच महत्त्वाची

पुढारी ऑनलाईन: स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीस्तव यांची ४२ दिवस  मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज ( दि. २१  )अखेर संपली. ५९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. राजू श्रीस्तव यांना १० ऑगस्ट २०२२ रोजी जीममध्ये वर्कआऊट करतानाच हृदयविकाराचा झटका आला होता. राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूनंतर स्पष्ट झाले की, शारीरिक क्षमता न जाणून घेता केलेला अति व्यायाम हा अनेकवेळा जीवघेणा ठरू शकतो. यापूर्वी देखील बॉलीवूडमधील बिग बॉस १३ रियालिटी शो विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार या दोघांचा मृत्यू देखील हदयविकाराने झाला होता.

व्यायाम किंवा शारीरिक कसरती करताना हृदयविकाराचा झटका येवू शकतो. तुमचे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रोल नियंत्रणात असले तरी, तुमचे हार्ट सुरक्षित असेलच असे काही सांगता येत नाही. काहीवेळा अनुवंशिकतेमुळेसुद्धा ह्रदयविकाराची समस्या निर्माण होऊ शकते. आपली बदलेली लाईफस्टाईलदेखील या गंभीर आजाराला तितकीच कारणीभूत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी जाणून घेवूया…

वाढत्या वयानुसार धोका अधिक

ह्रदयासंबंधी आजार हे व्यक्तीच्या वयावर अवलंबून असतो. नियमित व्यायाम करणाऱ्या कमी वयाच्या व्यक्तीमध्ये ह्दयरोगाचा धोका कमी असतो. परंतु वाढत्या वयाबरोबर अति व्यायाम देखील धोकादायक ठरु शकतो. वाढत्या वयाबरोबर ब्लड फ्रेशर आणि कोलेस्ट्रोलचे प्रमाणात वाढते. त्यामुळे वाढत्या वयाच्या व्यक्तींनी नियमित चेकअप करणे गरजेचे आहे.

आपली शारीरिक क्षमता ओळखा

तज्ज्ञांच्या मतानुसार, व्यक्तीला आपल्या शारीरिक क्षमता लक्षात घेऊनच, व्यायाम करायला हवा. प्रत्येकाच्या शरीराची क्षमता वेगवेगळी असते. कित्येकवेळा शारीरिक क्षमता नसलेल्या व्यक्तीदेखील अधिक व्यायाम करून घाम गाळतात. ह्दयाच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो. यामुळे ह्दयावर सतत ताण येताे. त्यामुळे आपल्या शारीरिक क्षमता ओळखून शरीराला झेपेल तेवढाच व्यायाम करावा.

अधिक वजन उचलणे टाळा

व्यायाम करताना काहीजण क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलून व्यायाम करतात. तुमच्या शारीरिक क्षमता लक्षात घेत गोल निश्चित करा. हळूहळू वजनाची मर्यादा वाढवत जा. अधिक वजन उचलणे टाळणे फायदेशीर ठरते.

‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

जेव्हा तुम्ही गंभीर आजारी पडणार असता, तेव्हा तुमचे शरीर काही संकेत देते असते. ज्या लोकांना हार्ट ॲटॅक येतो. यामधील कित्येक व्यक्ती हे शरीराने दिलेल्या संकेताकडे दुर्लक्ष करतात. तज्ज्ञांच्या मतानुसार, हार्ट ॲटॅक येणाऱ्या १/3 व्यक्तींमध्ये एक आठवड्यांपासूनच लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले तर हार्टॲटॅकची शक्यता कमी होऊ शकते. तुमचे शरीर व्यवस्थित कार्यरत नसेल, तर अधिकचा थकला, श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत दुखणे अशी लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेणे आवश्यक ठरते.

हेही वाचा:

Back to top button