राजीनामे द्या आणि आपापल्या मतदारसंघात निवडून येऊन दाखवा : संजय राऊत | पुढारी

राजीनामे द्या आणि आपापल्या मतदारसंघात निवडून येऊन दाखवा : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन : एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेतील बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघत आहे. शिंदे बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटीला दाखल झाल्यापासून राजकीय तर्कवितर्कांना ऊत आला आहे. या धर्तीवर हिम्मत असेल तर सर्व आमदारांनी राजीनामे देऊन परत आपापल्या मदारसंघात येऊन निवडून येऊन दाखवावे असे आज (दि.२६) शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेबांचे भक्त कधी पाठीत खंजीर खुपसत नाहीत तसेच अडीच वर्ष मलईदार खाती होती त्यावेळी अन्याय होत नव्हता का? असा सवाल राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केला आहे. बंडखोरांमध्येही बंडखोरी होऊ शकते तसेच काही बंडखोर आमदारांची परत येण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी सूचित केले आहे .

हेही नक्की वाचा

Sanjay Raut Tweet : ‘कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा… चौपाटी में.. संजय राऊतांच खोचक ट्विट

२१ आमदार आमच्या संपर्कात, एकनाथ शिंदेेंसोबतची चर्चा आता संपली : संजय राऊत

‘ईडी’च्या कारवाईमुळे १६ आमदारांचे बंड, त्‍यांचा हिंदूत्वाशी संबंध नाही : संजय राऊत

Back to top button