Sanjay Raut Tweet : ‘कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा… चौपाटी में.. संजय राऊतांच खोचक ट्विट

Sanjay Raut Tweet
Sanjay Raut Tweet
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा.. चौपाटी में.. अस  खोचक ट्विट  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा खास शैलीतला फोटोसुध्दा शेअर केला आहे. (Sanjay Raut Tweet)

Sanjay Raut Tweet : 'कब तक छिपोगे…

विधानसभेच्या निवडणूकानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच रंगले आहे. गेले सहा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमयरित्या वळण येत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. आज सकाळी सकाळी शिवसेना खासदार यांनी एक ट्विट केले आहे. या खोचक ट्विटची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, 'कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा.. चौपाटी में.. आणि या फोटोमध्ये त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष  नरहरी झिरवाळ यांनी कमरेवर हात ठेवलेला आणि पांढरी टोपी घातलेला खास शैलीतला फोटो शेअर केला आहे.  हे ट्विट करत त्यांनी एकप्रकारे बंडखोरांना मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. या ट्विट बरोबरच नरहरी झिरवळ यांच्या फोटोचीही चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.  

तर एकीकडे बंड पुरारलेल्या एकनाथ शिंदे यांनी सुध्दा एक ट्विट करत शिवसैनिकांना आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी लिहल आहे की,  प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! महाविकास आघाडीच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताकरीता समर्पित आहे. आपला एकनाथ संभाजी शिंदे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news