बाहेर पाटी स्पा सेंटरची ! आत मात्र सुरु होता भलताच प्रकार, वाचा सविस्तर | पुढारी

बाहेर पाटी स्पा सेंटरची ! आत मात्र सुरु होता भलताच प्रकार, वाचा सविस्तर

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील विमाननगर या मध्यवर्ती परीसरात मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी सायंकाळी उशिरा केला. परराज्यातील मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला असून या मुलींची सुटका करण्यात आली आहे.

स्पा मॅनेजर आरोपी इमदादुला इस्माईल अली, (वय १९ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. तसेच सदर स्पा चे मालक शंतनू सरकार, स्पा मॅनेजर शमसूद्दीन, जयराम वॅलपूली यांचा पोलिस शोध घेत आहे.

याेगी सरकारचा माेठा निर्णय : युपीत महिला कामगारांची नाईट शिफ्ट रद्द

शनिवारी विमाननगर पोलिस स्टेशन हद्दीतील ‘अमेया स्पा’, सुमा श्रीधरन निवास बंगला, विमाननगर लेन नंबर ३, विमाननगर, पुणे येथे मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांना मिळाली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या स्पा सेंटरवर बनावट ग्राहक पाठवून सापळा रचण्यात आला.

यावेळी मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसचे नावाखाली, जादा रक्कम पैसे घेऊन वेश्याव्यवसाय करीत असल्याची खात्री झाली. त्यावरुन स्पा मॅनेजर आरोपी इमदादुला इस्माईल अली, (वय १९ वर्षे) याला अटक करण्यात आली. तर या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. त्यातील एक पीडित महिला ही मिझोराम येथील आहे.

Suicide in Delhi : दिल्लीत न्यायमूर्तींची पत्नीसह आत्महत्या

सदर गुन्ह्यात रोख रकमेसह एकूण रु. ९ हजार २०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपींविरुद्ध विमाननगर पोलिस स्टेशन येथे कलम ३७०, ३४ भा.दं.वि. सह पिटा कायदा कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे उपायुक्त श्रीनिवास घाटगे, यांचे मार्गदर्शनखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, महिला पोलीस उप निरीक्षक सुप्रिया पंढरकर तसेच महिला पोलिस हवालदार मोहीते, अंमलदार अश्विनी केकाण, हनुमंत कांबळे, आण्णा माने यांनी केली.

 फोन केल्यावर अमेय स्पा सेंटरचे मेसेज

विमाननगर परीसरातील एखाद्या इसमाने जस्ट डायल या फोन सुविधेमध्ये मसाज पार्लर बाबत कोणत्याही प्रकारची माहितीची विचारणा केली की त्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर अमेय स्पा व मसाज सेंटरचे मेसेज येणे सुरु होत होते. त्यातून त्या व्यक्तीला गिऱ्हाईक बनवून, मसाजचे नावाखाली वेश्याव्यवसाय केला जात होता.

पुणे :अचानक लागलेल्या आगीत बारा दुचाकी, एक कार भस्मसात

 

Back to top button