पुणे :अचानक लागलेल्या आगीत बारा दुचाकी, एक कार भस्मसात | पुढारी

पुणे :अचानक लागलेल्या आगीत बारा दुचाकी, एक कार भस्मसात

 पुढारी वृत्तसेवा 

जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळील साईप्रसाद बिल्डींग मधील पार्किंग मध्ये रात्री उशिरा अचानक लागलेल्या आगीत बारा दुचाकी आणि एक कार अशा गाड्या जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाने ही आग पाऊण तासात आटोक्यात आणली. रात्री उशिरापर्यंत कूलिंग चे काम सुरू होते.  आगीची माहिती शनिवारी रात्री उशिरा अग्निशमन दलाला मिळाली.

त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ साईप्रसाद नावाची बिल्डींग आहे. रात्री एक कार पावणे अकराच्या सुमारास इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क करण्यात आली होती. ही कार पार्क करण्यात आल्यानंतर अर्धा ते पाऊण तासाच्या अंतराने इमारतीच्या पार्किंगमध्ये अचानक आग लागली.

सोलापूर : ‘स्मार्ट सिटी’च्या कारभारात ‘गोलमाल’

यावेळी बारा दुचाकी आणि एक कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले समोरच्या गेटमधून अग्निशमन वाहन जाणे अशक्य असल्याने मागील बाजूने जाऊन गेट तोडून प्रवेशाची व्यवस्था केली गेली. अग्निशमन दलातील जवानांनी लागलीच पाण्याचा मारा सुरू करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली तर पावणेदोन तासात आग पूर्णपणे विझवण्यात आली.

क्वाड एक पाऊल पुढे !

कारने अचानक पेट घेतल्याने ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता अग्निशमन दलाने वर्तवली आहे. कार लांबचा प्रवास करून आली असल्याने गरम झाली होती. यामुळेच आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव आणि त्यांच्या जवानांनी ही आग विझवली.

Back to top button