Lok Sabha Elections 2024 | रावेरसाठी 31 तर जळगावसाठी 25 उमेदवार मैदानात | पुढारी

Lok Sabha Elections 2024 | रावेरसाठी 31 तर जळगावसाठी 25 उमेदवार मैदानात

जळगाव- लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत रावेरसाठी 31 उमेदवारांनी 45 अर्ज दाखल केले आहे. तर जळगाव साठी 25 उमेदवारांची 36 अर्ज दाखल केलेले आहेत. दि. 26 रोजी होणाऱ्या छाननी नंतर मैदानात कोण राहणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र रावेर लोकसभेमध्ये श्रीराम पाटील या नावाने तीन उमेदवार रिंगणात उतरलेले दिसत आहे.

लोकसभा निवडणूक 2024 चे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दि. 25 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी 21 अर्ज भरले तर रावेर साठी 11 उमेदवारांनी 18 अर्ज भरले. गुरुवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शेवटच्या दिवसांपर्यंत जळगांव लोकसभा मतदार संघात एकूण 31 उमेदवारांनी 45 अर्ज दाखल केले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात 25 उमेदवारांनी 36 अर्ज दाखल केले आहेत.

दि. 26 रोजी छाननी होणार असून यानंतर रावेर लोकसभा व जळगाव लोकसभा यांचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर दि. 29 रोजी माघारी नंतर कोण उमेदवार रिंगणात राहील याचे चित्र स्पष्ट होऊन सामना रंगणार आहे. रावेर लोकसभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्यासह याच नावाचे श्रीराम पाटील अजून दोन उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले आहेत.

हेही वाचा –

Back to top button