याेगी सरकारचा माेठा निर्णय : युपीत महिला कामगारांची नाईट शिफ्ट रद्द | पुढारी

याेगी सरकारचा माेठा निर्णय : युपीत महिला कामगारांची नाईट शिफ्ट रद्द

पुढारी ऑनलाईन : 
यूपी सरकारने महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने आदेश काढला आहे. यामध्ये राज्यभरातील कारखान्यांमध्ये कोणत्याही महिला कामगारांना रात्री ७ ते सकाळी ६ पर्यंत कामाची सक्‍ती  करता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट केले आहे. नोएडा, गाझियाबादसह संपूर्ण यूपीमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या आणि नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांसाठी सरकारने हा आदेश काढला आहे.

या आदेशात म्हटले आहे की, “कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या घटना रोखण्यासाठी आणि महिला कामगारांना सुरक्षित वातावरण देणे ही  मालकाची जबाबदारी असेल. ‘सायंकाळी सात नंतर काम नाही’ म्हणजेच उत्त प्रदेशमध्ये आता महिलांना कारखाना प्रशासनाला रात्री ७ ते सकाळी ६ पर्यंत कामाची सक्‍ती करता येणार नाी

लेखी संमती आवश्‍यक, नाईट शिफ्टला नकार दिल्‍यास कारवाई हाेणार नाही

“कोणत्याही महिला कर्मचाऱ्याला लेखी संमतीशिवाय सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी ७ नंतर काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. वरील वेळेत काम करणार्‍या महिला कर्मचारी ते अधिकार्‍यांना मोफत वाहतूक, भोजन आणि पुरेशी देखरेख देखील प्रदान करावी लागेल.”जर एखाद्या महिला कर्मचाऱ्याने सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी ७ नंतर काम करण्यास नकार दिला तर तिला कामावरून काढून टाकले जाणार नाही.

“कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या घटना टाळण्यासाठी महिला कामगारांना सुरक्षित कामाचे वातावरण प्रदान करणे ही नियोक्त्याची जबाबदारी असेल. याशिवाय, नियोक्त्याने कामाच्या ठिकाणी  सुरक्षा देखील प्रदान करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाचे  प्रतिबंध आणि निवारण अधिनियम, 2013 किंवा कारखान्यात मजबूत तक्रार यंत्रणा विकसित करण्यासाठी इतर कोणतेही संबंधित कायदे विकसित करणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button