Suicide in Delhi : दिल्लीत न्यायमूर्तींची पत्नीसह आत्महत्या | पुढारी

Suicide in Delhi : दिल्लीत न्यायमूर्तींची पत्नीसह आत्महत्या

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीतील साकेत न्यायालयात कार्यरत असलेल्या एका न्यायमूर्ती आणि त्याच्या पत्नीने ( Suicide in Delhi) आत्महत्या  केली. हा खळबळजनक प्रकार रविवारी (दि.२९) सकाळी उघडकीस आला. अशोक बेनीवाल असे आत्महत्या केलेल्या न्यायमूर्तींचे नाव आहे.

बेनीवाल यांनी त्यांच्या भावाच्या घरात गळफास लावून आत्महत्या ( Suicide in Delhi) केली. दक्षिण दिल्लीतील साकेत न्यायालयात बेनीवाल दीर्घकाळापासून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येच्या कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती योगेश कुमार यांनी आत्महत्या केली होती.

हेही वाचलंत का ?  

Back to top button