Radio : दिवस तुझे हे …’ ऐकायचे ’ | पुढारी

Radio : दिवस तुझे हे ...’ ऐकायचे ’

कोल्हापूर : पूनम देशमुख

नमस्कार! बहनों और भाईयो , आप सून रहे हैं विविध भारती….’ हे वाक्य ऐकलं की, काळ मागे सरतो आणि रेडिओच्या जमान्यात घेऊन जातो. आता ‘गुड मॉर्निंग… कोल्हापूरकर’ या एफएमवरील सुरात वास्तवात येतो. रेडिओ पहिल्या पिढीचे लोकप्रिय प्रसारमाध्यम. इतिहासातल्या महायुद्धापासून ते शीतयुद्धापर्यंत अनेक महत्त्वाच्या घटना या रेडिओनेच जगाच्या कानाकोपर्‍यांत पोहोचवल्या. क्रिकेटचे सामनेही या रेडिओमुळेच अनुभवता आले. याच रेडिओने आवाजाचे अनेक बादशाह तयार केले आहेत.

  • जेव्हा राहुल बजाज यांनी प्रश्नांची सरबत्ती करून थेट अमित शहांना खडे बोल सुनावले होते ! (video)विज्ञान अन् तंत्रज्ञानात झपाट्याने बदल झाला असला आणि करमणुकीची अनेक साधने आली असली, तरी रेडिओचे महत्त्व आजही अबाधित आहे. आता टीव्ही आणि स्मार्ट फोनचा जमाना असला, तरी आजही रेडिओची भुरळ कायम आहे. रेडिओची भाषा बदलली. निवेदकांची जागा ‘आरजे’ने घेतली. या क्षेत्रात मुलींचीही संख्या अलीकडच्?या काळात वाढत असल्?याचे दिसून येत आहे. शांत, संयमी भाषेला सुपरफास्ट, इंग्रजीची जोड असलेली भाषा आता रेडिओवर ऐकू येते.

Radio-रेडिओचा ‘आवाज’ आजही बुलंद

इंटरनेटचे जाळे आणि सोशल मीडियाच्या मायाजालात रेडिओचा ‘आवाज’ आजही बुलंद आहे. ‘आवाजाच्या दुनिये’ची जादू कायम आहे. काळाप्रमाणे तंत्रज्ञान आणि कार्यक्रमांच्या मांडणीचे स्वरूप बदलत गेले, तरी एफएम, कम्युनिटी रेडिओ, इंटरनेट रेडिओच्या स्वरूपात रेडिओने अनेकांच्या मनात ‘आपली आवड’ जपली आहे.एखाद्या शहरात मर्यादित फ्रिक्‍वेन्सीद्वारे चालविले जाणारे एफएम रेडिओ 1972 मध्ये भारतात आले. ते लोकप्रिय झाले. देशभरात आज विविध शहरांमध्ये शंभरहून अधिक एफएम केंद्रे चालविली जातात. मुख्यत: तरुणाई हेच त्यांचे ‘टार्गेट ऑडियन्स’ असतात. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील अनेक आकाशवाणी चॅनेल्स हे ‘ऑल इंडिया रेडिओ’ या अ‍ॅपवर ऐकता येतात. जगभरातील इंग्रजीसह अन्य भाषांतील केंद्रही अ‍ॅपवर ऐकता येतात. तसेच, ीरवळे.सरीवशप.लेा या एकाच लिंकवर जगभरातील रेडिओ केंद्रांवर संगीत, भाषा शिक्षण, बातम्या, कम्युनिटी संदेश ऐकता येतात.

Radio-डीएमआर रेडिओची संकल्पना

लवकरच भारतात डिजिटल मोबाईल रेडिओ (डीएमआर) ही अत्याधुनिक रेडिओ यंत्रणा सुरू होणार आहे. त्यामुळे तो इंटरनेटशिवायही ऐकता येईल. भारतात ते एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी सुरू होणार आहे.

जगातला पहिला रेडिओ

जगातला पहिला रेडिओ 1895 मध्ये इटलीमध्ये गुगलैल्मो मार्कोनीने तयार केला, तेव्हा ते साधे बिनतारी संदेशवहनाचे यंत्र होते. त्यानंतर रेडिओने प्रसारमाध्यम क्षेत्रात क्रांती घडवली. भारतात 1923 ला रेडिओचं प्रक्षेपण सुरू झाले. आज आकाशवाणीच्या सेवेत देशभरात 479 स्थानके समाविष्ट असून त्यामध्ये 23 भाषा आणि 179 बोलीभाषांत कार्यक्रमांचे प्रक्षेपण केले जाते. देशाच्या जवळपास 92 टक्के क्षेत्रापर्यंत एकूण लोकसंख्येच्या 99.19 टक्क्यांपर्यंत हे माध्यम पोहोचले आहे. कोल्हापूरमध्ये ‘टोमॅटो 94.3’ एफएम, ‘रेडिओ मिर्ची 98.3’ एफएम, ‘रेडिओ सिटी 95’ एफएम, ‘बिग 92.7’ एफएम, ‘ऑल इंडिया रेडिओ’ आणि ‘आकाशवाणी’ कार्यरत आहे.

हेही वाचा:

Back to top button