बहुप्रतीक्षित वॉटर टॅक्सी सेवा १७ फेब्रुवारीपासून मुंबई आणि नवी मुंबईकरांच्या सेवेत

बहुप्रतीक्षित वॉटर टॅक्सी सेवा १७ फेब्रुवारीपासून मुंबई आणि नवी मुंबईकरांच्या सेवेत

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बहुप्रतीक्षित वॉटर टॅक्सी येत्या 17 फेब्रुवारीपासून मुंबईकर आणि नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे.
केंद्रीय बंदर आणि जलवाहतूकमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते वॉटर टॅक्सीचे उद्घाटन होईल.

मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि सिडको यांचा संयुक्‍त प्रकल्प असलेल्या या वॉटर टॅक्सीला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार होते. परंतु, कोरोनामुळे उद्घाटन लांबले. आता मुंबई 100 टक्के निर्बंधमुक्‍तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याने उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे.

डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते बेलापूरमार्गे पुढे माझगाव येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल आणि एलिफंटापर्यंत जाण्यासाठी एका प्रवाशाला 290 रुपये आकारण्यात येतील, तर महिन्याच्या पासासाठी 12 हजार रुपये आकारण्यात येणार आहेत, तर बेलापूर आणि एलिफंटापासूनच्या परतीच्या प्रवासाला 825 रुपये आकारण्यात येतील, असे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी म्हणाले.

  • नवी मंबईहून जेएनपीटी, एलिफंटा आणि रेवस याठिकाणी जाण्यासाठी वॉटर टॅक्सीचा उत्तम पर्याय
  • मुंबई ते नवी मुंबई केवळ अर्ध्या तासात पोहोचता येणार.
  • माझगावच्या डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलपासून मार्गाची सुरुवात.
  • बेलापूर, नेरुळ, वाशी, ऐरोली, रेवस, जेएनपीटी,करंजाडे, माझगाव येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल, एलिफंटा लेणी असा हा मार्ग असेल.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news