राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोनामुक्त | पुढारी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोनामुक्त

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सात दिवसांच्या उपचारानंतर अखेर कोरोनामुक्त झाले आहेत. शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती खुद्द शरद पवारांनीच ट्विटरवरुन दिली आहे.

२४ जानेवारी रोजी त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. आज त्यांची चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर कोरोनातून लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर आणि प्रार्थना करणारे मित्रपरिवार, सहकारी आणि शुभचिंतकांचे पवार यांनी आभार मानले आहेत.

२४ जानेवारी  रोजी त्यांनी स्वतः ट्विट करत  पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. ”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण चिंता करण्याचे कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.” असे शरद पवार यांनी ट्विट मध्ये म्हटलं होते.  आज सहा दिवसांनंतल त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

हेही वाचलत का? 

Back to top button