PUNE: दुकानात घुसून पाकिट मारले; घटना सीसीटीव्हीत कैद | पुढारी

PUNE: दुकानात घुसून पाकिट मारले; घटना सीसीटीव्हीत कैद

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा

पारशी चाळीतील फॅशन पॉइंट या दुकानाचे शटर उचकटून पाकिटात ठेवलेले ८४४० रुपये व ६२ हजार ४४० रुपयांचे जीन्स व टी शर्ट आणि परफ्युम असे साहित्य चोरट्याने चोरून नेले. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत. देहूरोड बाजार पेठ पारशी चाळ येथील फॅशन पॉइंट या दुकानात ही चोरी झाली. सीसीटीव्ही पाच मुले चोरी करताना दिसत आहे. हातात काहीतरी घेऊन शटर उचलण्यात आले. (PUNE)

आत आल्यानंतर हाताला मिळेल ते घेऊन पळाले. अवघ्या तीन मिनिटात ही चोरी झाली आहे. बाहेर उभ्या असलेल्या रिक्षातून चोरट्यांनी पोबारा केला. याप्रकरणी साहिल मोहम्मद शेख ( वय ३७, रा. वृंदावन सोसायटी देहूरोड ) याला पहाटे साडेचारच्या सुमारास शेजारच्या व्यक्तीने फोन करून सांगितले. त्याने येऊन पाहिले असता दुकानात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याने या प्रकरणी देहूरोड पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत. (PUNE)

देहू रोड परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्यात श्री कॉलनी येथे राहणाऱ्या विजय मोरे याच्या सेंट्रींग प्लेट चोरून नेल्या होत्या. गेल्या आठवड्यात २७ व नंतर १६ प्लेट चोरून नेल्या. याचप्रमाणे चोरटे साईनगर मामुर्डी या भागातील रिक्षा चोरी करतात व चोरलेला माल पसार केल्यानंतर रिक्षा परत येथे आणून लावतात. हा प्रकारही अनेकदा रिक्षावाल्यांच्या नजरेत आलाय; पण पोलीस ठाण्यात याची तक्रार घेतली जात नाही. देहू येथेही चोरट्यांनी उच्छाद मांडला. (PUNE)

हेही वाचलतं का ?

Back to top button