धक्कादायक! आईने बाळाला झोपण्यासाठी पाळण्याऐवजी ‘ओव्हन’मध्ये ठेवलं अन्… | पुढारी

धक्कादायक! आईने बाळाला झोपण्यासाठी पाळण्याऐवजी 'ओव्हन'मध्ये ठेवलं अन्...

पुढारी ऑनलाईन डेस्क : आईसाठी तिच्या बाळापेक्षा अधिक मौल्यवान काहीही नसतं. मात्र, जगात अशा काही घटना घडतात ज्याने आईच्या ममतेला ठेच पोहचते. अमेरिकेत एका आईने तिच्या बाळाला झोपण्यासाठी पाळण्याऐवजी चुकून ओव्हनमध्ये (Microwave Oven) ठेवल्याने बाळाचा गुदमरून मृत्यू झाला. मारिया थॉमस असे त्या आईचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना एका साक्षीदाराने सांगितले की, आईने ‘मुलाला झोपण्यासाठी पाळण्यामध्ये ठेवण्याऐवजी चुकून ओव्हनमध्ये (Microwave Oven) ठेवले.’ मात्र ही चूक कशी झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मारिया थॉमसवर तिच्या नवजात बाळाची हत्या केल्याचा आरोप आहे.

मी चुकून बाळाला ओव्हनमध्ये ठेवले : मारिया थॉमस

याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता महिलेने सांगितले की, रात्री मुलाला खाऊ घातल्यानंतर तिने त्याला पाळण्याजवळ झोपवण्यास सुरुवात केली. पण तिने चुकून बाळाला ओव्हनमध्ये (Microwave Oven) कसे ठेवले हे समजले नाही. सकाळी जाग आली तेव्हा तिला ओव्हनमध्ये बाळ दिसले. शवविच्छेदनात बाळाचा मृत्यू गुदमरल्याने आणि भाजल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

चौकशीदरम्यान मारिया थॉमसने ही घटना चुकून घडल्याचे सांगितले आहे. मात्र पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. महिलेची वैद्यकीय तपासणीही केली जात आहे. शिवाय तिचा फोनही जप्त करून तपासासाठी पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button